crime sakal
पुणे

महिलेच्या खुनाचा तीन तासातच छडा

पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर महिलेची ओळख पटवून तातडीने तपासाला

सकाळ वृत्तसेवा

वालचंदनगर : येथील महिलेच्या खून प्रकरणाचा तपास वालचंदनगर पोलिसांनी तीन तासामध्ये लावून आरोपीला अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी अक्षय बाळू साठे (वय २१,रा.जांब) याला अटक केली. या घटनेमध्ये संगिता पांडुरंग वाघमारे (वय ४५, रा.वडजल,ता.माण,जि.सातारा) या महिलेचा खून झाला आहे.

जांब गावामध्ये बुधवार(ता. २४) रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास उसाच्या शेतामध्ये नाागरिकांना ४५ वर्षाच्या महिलेचा मृतदेह आढळला होता. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर महिलेची ओळख पटवून तातडीने तपासाला सुरवात केली. तीन तासामध्ये अक्षय साठे या आरोपीला ताब्यात करुन अटक केली.वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार गेल्या काही दिवसापूर्वी संगिता वाघमारे ही जांब गावामध्ये राहत होती. जांब गावातील महेंद्र मच्छिंद्र गायकवाड व संगिता वाघमारे यांच्या किरकोळ भांडण झाले होते. यामध्ये गायकवाड याला वाघमारे हिने शिवीगाळ केली होती.

या कारणावरुन महेंद्र गायकवाड याचा नातेवाईक अक्षय साठे याने संगिता वाघमारे हिच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन तिचा खून केला. व मृतदेह उसाच्या व बाजरीच्या शेतामधील बांधावर टाकला. बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, वालचंनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे,पोलिस उपनिरीक्षक अतुल खंदारे, राम मेटापल्ली,विजय टेळकीकर , साहय्यक फौजदार शिवाजी निकम,बाळासाहेब पानसरे,विनाेद पवार,शैलेश स्वामी,अमर थोरात यांनी तपास करुन तीन तासामध्ये आरोपीला जेरबंद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Administrative Reshuffle : प्रशासनात मोठा भूकंप! १५ IAS अधिकाऱ्यांसह ३८ बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पाहा कोणाची कुठे झाली रवानगी?

IND vs WI, 3rd ODI: केएल राहुलचं क्लासिकल शतक! रोहित-ऋतुराजची अर्धशतकं; भारताने वेस्ट इंडिजसमोर उभा केला धावांचा डोंगर

Asian Games 2026: हॉकीत भारतच आशियाचा राजा! महिलांनंतर पुरुष संघानेही जिंकलं गोल्ड मेडल; ऑलिम्पिक तिकीटही पक्के

Latest Marathi News Live Update : आरोपी नीलेश आरते याला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

SCROLL FOR NEXT