The woman in the rickshaw was killed on the spot in the accidnt the tanker 
पुणे

पोलिसांत भांडणाची तक्रार केली, घरी येताना टँकरच्या धडकेत महिलेचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

लोणी काळभोर (पुणे) : लोणीकंदकडून थेऊर फाट्याकडे येणाऱ्या एका इंधन टँकर व रिक्षा यात झालेल्या अपघातात एका 22 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला.  दोघेजण किरकोळ जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (ता. २९ ) रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास थेऊर (ता. हवेली) हद्दीतील थेऊर पावर हाऊस वाशिंग सेंटर येथे घडली. अनिता सुनिल लोंढे (वय- २२ रा. इंदिरानगर, थेऊर, ता. हवेली) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अनिता यांचा भाऊ मंदार राजू सकट (वय- २०, रा. इंदिरानगर, थेऊर, ता. हवेली ) यांनी टँकरचालक (नाव व पत्ता माहिती नाही.) यांच्याविरोधात लोणी काळभोर पोलिसात तक्रार दिली आहे. 

PMC Budget 2021-22 : पुणे महापालिका बजेट ठळक मुद्दे काय आहेत वाचा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदार सकट हे मजुरी करतात. शुक्रवारी संध्याकाळी शेजारी राहत असलेल्या कुटुंबातील व्यक्तींशी किरकोळ भांडण झाले होते. त्यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी मंदार सकट यांच्याबरोबर आई, चुलती, बहीण अनिता व तिचा तीन वर्षे वयाचा मुलगा व बहीण सुमन असे सर्वजण लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आले होते. 

पोलीस ठाण्यातील काम झाल्यानंतर परत थेऊर या ठिकाणी जात असताना मंदार सकट, आई , चुलती, बहीण सुमन, व अनिताचा तीन वर्षांचा मुलगा असे एका रिक्षात व अनिताचा मानलेला भाऊ अस्लम हे एका रिक्षात थेऊर या ठिकाणी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास जाण्यासाठी निघाले. मंदार सकट हे घरी पोहचल्यानंतर त्यांना फोनवरून माहिती मिळाली की थेऊर फाट्यावरील पावर हाऊस वाशिंग सेंटर या ठिकाणी इंधन टँकर व रिक्षा यांचा अपघात झाला आहे. 

दरम्यान, त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता बहीण अनिता लोंढे ही कोणत्याही प्रकारची हालचाल करताना आढळून आली नाही. तिचा जागेवरच मृत्यू झाला होता. तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप बोरकर करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Municipal Results: साेलापूर जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये भाजप अपेक्षित यशापासून दूर; चार ठिकाणी विजय, उमेदवार निवडीत चुका नडल्या..

Mohan Bhagwat : भारत एक हिंदू राष्ट्र, हेच सत्य,संवैधानिक मंजुरीची आवश्यकता नाही; मोहन भागवत यांचे मोठे विधान

Panchang 22 December 2025: आजच्या दिवशी शिवकवच स्तोत्राचे पठण व ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

Latest Marathi News Live Update : संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्याला अटक, बंगळूरस्थित कंपनीकडून घेतली लाच

Ajit Pawar: कोणी सुरुवात केली, तर दुसराही करू शकतो; पक्षप्रवेशाबाबत अजित पवारांचे सूचक वक्तव्य, दिल्लीतील वरिष्ठांशी बाेलेन नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT