Crime sakal
पुणे

Pune Crime : चापट मारल्यामुळे महिलेकडून पतीवर चाकूने वार; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

जेवण वाढताना झालेल्या किरकोळ वादातून महिलेने पतीवर चाकूने वार करून जखमी केले. ही घटना भवानी पेठ परिसरात घडली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - जेवण वाढताना झालेल्या किरकोळ वादातून महिलेने पतीवर चाकूने वार करून जखमी केले. ही घटना भवानी पेठ परिसरात घडली. या प्रकरणी महिलेविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत रमेश बबन ससाणे (वय ४३) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जया रमेश ससाणे (वय ३४, रा. पत्र्याची चाळ, जयभीम मित्र मंडळाजवळ, भवानी पेठ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश ससाणे रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कामावरून जेवण करण्यासाठी घरी आले. त्यावेळी पत्नी जयाने त्यांच्याकडे पाचशे रुपये मागितले.

परंतु पैसे न दिल्यामुळे त्यांच्यात भांडण झाले. त्यावेळी पत्नीने जेवण वाढताना ताट आणि तांब्या जोरात आपटला. त्यावर रमेश यांनी पत्नीला चापट मारली. त्याचा राग आल्याने जयाने पती रमेश यांच्या दंडावर आणि पाठीवर चाकूने वार केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी झालेल्या पतीला रुग्णालयात दाखल केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Atpadi news : शिवसेनेचे तृतीयपंथी पंचायत समिती सदस्याचा हृदयविकाराने मृत्यू, सांगलीच्या आटपाडीमधील घटना

Block Layoffs : AI ने हिरावला तोंडचा घास ! दिग्गज अमेरिकन कंपनीने ४००० हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ

Latest Marathi News Live Update : कुसुमाग्रज उद्यानात मनसैनिक करणार आंदोलन

Ruoming Pang: 1800 कोटींचं पॅकेजही ठरलं कमी! कोण आहेत Ruoming Pang? Google, Meta, Apple आणि OpenAI मध्ये रस्सीखेच; शेवटी कोण जिंकलं?

Thane News: ठाण्यातील वनजमिनीवरील पाच दशकांचा शासनाचा दावा फेटाळला, राज्य सरकारला उच्च न्यायालयाचा दणका

SCROLL FOR NEXT