murder case sakal
पुणे

Pune Crime : कौटुंबिक वादातून महिलेच्या गळ्यावर वार करून खून

कौटुंबिक वादातून पत्नीवर चाकूने वार करून खून केल्याची घटना खराडी परिसरात घडली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कौटुंबिक वादातून पत्नीवर चाकूने वार करून खून केल्याची घटना खराडी परिसरात घडली. पत्नीचा खून केल्यानंतर पती चंदननगर पोलिस ठाण्यात हजर झाला.

लक्ष्मी केशव सीताफळे (वय ४०, रा. पाटीलबुवानगर, खराडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी चंद्रकांत धर्मण्णा बनसोडे (वय ४७, रा. आंबेडकरनगर, खराडीगाव) यांनी फिर्याद दिली आहे. पती केशव भीमराव सीताफळे (वय ४५) याच्यावर चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी आणि पती केशव यांच्यात २४ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कौटुंबिक कारणावरून वाद झाला. या वादात केशवने पत्नीला शिवीगाळ करुन तिच्या गळ्यावर चाकूने वार केले. त्यात गंभीर जखमी झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket : पाकिस्तानची संगीत खुर्ची! मोहम्मद रिझवानचा 'करेक्ट कार्यक्रम' करून २५ वर्षीय खेळाडूला केलं कॅप्टन

'माझ्यात जी चमक आहे ती तमन्नामध्ये नाही' राखी सावंत तमन्नाबद्दल बोलताना म्हणाली...'आमच्या आयटम सॉन्गमध्ये घुसली आणि...'

Ahilyanagar News: 'लक्ष्मीपूजनासाठी दुपारी तीन वाजेपासून मुहूर्त'; अहिल्यानगर शहरात दिवाळी सणाचा उत्साह; घरोघरी मंगलमय वातावरण

Kolhapur CBS Rada : कोल्हापूर सीबीएसवर एसटी नसल्याने प्रवासी संतापले, जोरदार घोषणाबाजी; नेमकं काय प्रकरण

'गुप्तांगाला स्पर्श करणेही बलात्कारच'; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वाचा निर्णय; ड्रायव्हरने दोन मुलींवर केला होता अत्याचार

SCROLL FOR NEXT