corona 
पुणे

धक्कादायक, हवापालटाला आणलेली आजारी आई निघाली कोरोनाबाधित... 

चिंतामणी क्षीरसागर

वडगाव निंबाळकर (पुणे) : आजारी आईला मुंबईहून घेऊन येणे मुलीला महागात पडले आहे. कारण, एक दिवसाच्या मुक्कामातच आई कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथे ही रुग्ण सापडली आहे. 

वडगाव निंबाळकर येथील जगताप वस्तीवर मुलीला भेटण्यासाठी संबंधित महिला 15 मे रोजी सायंकाळी 4 वाजता मुंबईहून आली होती. दरम्यान तिला यापूर्वीच ताप येत होता. घशातही खो- खो होत होती. पेशी कमी झाल्याने हवापालट करण्यासाठी मुंबईहून वडगावला त्या आल्या होत्या. मात्र, येथेही त्रास जाणवू लागल्याने त्यांना पुण्याला नेण्यात आले. ससूनमध्ये त्यांची तपासणी केली असता, त्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. 

त्यामुळे अवघ्या एका दिवसाच्या मुक्कामात किती जणांना कोरोनाचा संसर्ग झाला, याची माहिती काढण्यात स्थानिक प्रशासनाची धांदल उडाली आहे. ही महिला मुंबईस्थित असल्याने तिची नोंद मुंबईच्या की पुणे जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत धरायची, यावर सोमवारी रात्री उशिरापर्यंत प्रशासनाचा खल सुरू होता. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा   

दरम्यान, या घटनेनंतर वडगाव निंबाळकर व कोऱ्हाळे बुद्रूक येथे पुढील आठ दिवस कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे. दवाखाने व मेडिकल वगळता अन्य सर्व व्यवहार पुढील आठ दिवस बंद राहणार आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT