Daund Police Station sakal
पुणे

Daund Crime : स्त्रीबीज दान करण्यासाठी आलेल्या महिलेवर अत्याचार

स्त्रीबीज दान करण्याच्या मोबदल्यात मोठी रक्कम देण्याचे आमिष दाखवून दौंड शहरात एका महिलेला डांबून ठेवत बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार आला उघडकीस.

प्रफुल्ल भंडारी

दौंड - स्त्रीबीज दान करण्याच्या मोबदल्यात मोठी रक्कम देण्याचे आमिष दाखवून दौंड शहरात एका महिलेला डांबून ठेवत बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी बलात्कार करणाऱ्या तरूणासह त्याला मदत करणाऱ्या महिलेविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात राहणार्या अशिया अन्वर शेख (रा. खंडोबा मंदिराशेजारी, बंब चाळीजवळचे रेल्वे क्वॅार्टर्स, दौंड) या महिलेने कृत्रिम मातृत्वासाठी (सरोगसी) स्त्रीबीज दान केल्यास चांगली रक्कम देण्याचे आमिष दाखवून संबंधित पीडित महिलेशी संपर्क साधला.

आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या पीडितेला अशिया हिने दौंड येथे स्वतःच्या घरी बोलावून घेतले. ज्यांना स्त्रीबीज हवे आहेत त्यांच्या मागणीनुसार क्रमांक येईपर्यंत दौंड येथे थांबावे लागेल, असे कारण देत अशिया शेख हिने पीडितेला थांबवून घेतले.

मधल्या काळात अशिया हिने पीडितेची छायाचित्रे काढून ती समाजमाध्यमांवरील काही ग्रुपमध्ये प्रसारित केली. त्या कारणावरून वाद झाल्यानंतर पीडिता स्वतःच्या घरी जाण्यास निघाली असता तिला एका खोलीत डांबून ठेवण्यात आले.

दरम्यान १२ सप्टेंबर रोजी अशिया शेख हिने इरफान शब्बीर खान नावाच्या तरूणाला घरी बोलावून त्याला पीडितेच्या खोलीत सोडले. इरफान खान याने अतिप्रसंग करताच प्रतिकार करणार्या पीडितेला बेदम मारहाण करीत बलात्कार केला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पीडितेने ८ ऑक्टोबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून इरफान शब्बीर खान (रा. कुंभार गल्ली) व अशिया अन्वर शेख (रा. दौंड) या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दौंड पोलिसांनी फिर्यादीनुसार भारतीय न्याय संहिता कलम ६९ (प्रलोभन दाखवून वा फसवून लैंगिक समागम करणे), कलम १२७ (३) (बंदिस्त करून ठेवणे), कलम ११५ (२) (इच्छापूर्वक जबर दुखापत पोचविणे) आणि कलम ३ (५) (समान उद्देश साध्य करण्यासाठी केलेली कृती) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अशिया शेख व इरफान खान यांच्या संपर्कात असलेल्या तरूणी, महिला, मदतनीस आणि स्त्रीबीज विकत घेणारे व त्यावर वैद्यकीय प्रक्रिया करणार्यांचा दौंड पोलिस शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Recruitment : खूशखबर! एसटी महामंडळात 17 हजार पदांची 'महाभरती'; कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली मोठी अपडेट

BCCI Awards: राहुल द्रविडला जीवनगौरव, तर टी२० संघातून वगळलेल्या खेळाडूला सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार

Kolhapur Politics : हसन मुश्रीफ केडीसीसी नाही गोकुळ निवडणूक लढवणार? एका वाक्यात दिलं स्पष्टीकरण; जिल्हा परिषदेत सतेज पाटील, मुश्रीफ एकत्र येणार?

Latest Marathi News Live Update : गॅस टंचाईमुळे लग्नसराईत अडचण; दोन हजार पाहुण्यांच्या जेवणावर प्रश्नचिन्ह

स्टार प्रवाहवरची 'ही' नायिका आहे तेजश्री प्रधानची बेस्ट फ्रेंड; शेअर केला फोटो; म्हणाली, 'ती माझी सपोर्ट सिस्टीम...'

SCROLL FOR NEXT