Crime News esakal
पुणे

Pune Crime : बिनव्याजी कर्जाच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या महिलेला अटक

बिनव्याजी कर्ज देण्याचे आमिष दाखवून एका महिलेने तिघांची ५९ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - बिनव्याजी कर्ज देण्याचे आमिष दाखवून एका महिलेने तिघांची ५९ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी महिलेला मंगळवारी अटक केली.

सकीना तायर पुनावाला (वय ३२, रा. कोंढवा) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत अंकुश दंडाप्पा बजलोर (वय ४०, रा. आंबेडकर नगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकीना पुनावाला ही फिर्यादी अंकुश बजलोर यांच्या घरी गेली. तिने आपण अदर पुनावाला यांच्या सेवाभावी संस्थेची कार्यकर्ता असून, या संस्थेकडून पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याचे आमिष फिर्यादीला दाखविले.

सकीना पुनावाला हिने फिर्यादीकडून १७ हजार रूपये, इरफान शेख यांच्याकडून २५ हजार रूपये आणि एका महिलेकडून १७ हजार रूपये घेतले. सकीनाने तिघांना बँकेचा बनावट धनादेश देवून ५९ हजार रूपयांची फसवणूक केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चेतन भोसले करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Cylinder: LPG गॅसच टेन्शन संपणार? युद्ध थांबल्यानंतर गॅस साठा आणि पुरवठ्याबाबत सरकारची मोठी माहिती

जास्त आइस्क्रीम आरोग्यासाठी घातक; कृत्रिम घटकांमुळे वाढतो आजारांचा धोका

MSRTC Bus Fare Hike : एसटी प्रवास महागणार, हंगामी वाढ १५ एप्रिलपासून; किती रुपयांनी वाढले आकडेवारी आली

शेतकरी कुटुंबातील ३ सख्ख्या बहिणी बनल्या पोलीस, प्रतिकूल परिस्थितीत यशाला गवसणी

Latest Marathi News Live Update : श्रीरामपूरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार; पोलीस ठाण्यासमोरच पंगत मांडून आंदोलन

SCROLL FOR NEXT