Divorce 
पुणे

सासरच्यांविरुद्ध तक्रार देणाऱ्या महिलेला शौचालयातच दिला तलाक 

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सासरच्या लोकांकडून सातत्याने होणाऱ्या छळास कंटाळून त्यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार देणाऱ्या महिलेला तिच्या पतीने सार्वजनिक शौचालयात तलाक दिल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. ही घटना लष्कर परिसरामध्ये घडली. 

याप्रकरणी कोंढवा बुद्रुक येथे राहणाऱ्या एका 30 वर्षीय महिलेने फिर्याद दाखल केली आहे. त्यावरुन तिच्या पतीविरुद्ध लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेचा 2015 मध्ये विवाह झाला होता. त्यानंतर पती, त्याचे आई-वडील, बहीण व नणंद यांनी घरगुती कारणावरुन, एटीएम कार्ड परत घेतल्याच्या रागातुन तिला शिवीगाळ करीत मारहाण केली.

त्यापुर्वी तिला वेगवेगळ्या कारणांवरुन मानसिक व शारिरीक त्रास दिला जात होता. त्यांच्या त्रासाला कंटाळून तिने कोंढवा पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. संबंधीत प्रकरण लष्कर न्यायालयात आहे. त्यानुसार, संबंधीत महिला न्यायालयीन कामकाजासाठी लष्कर न्यायालयात आली होती. त्यावेळी ती न्यायालयातील सार्वजनिक शौचालयामध्ये गेली. त्यावेळी तिचा पती व इतरांनी मला "तु आमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन चांगले केले नाहीस. त्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही. तु काहीही कर, माझे दुसरे लग्न ठरले असून मी लग्न करणार आहे.'' अशी धमकी देत फिर्यादीला तलराक दिला. त्यानंतर त्याने फिर्यादीला शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

US Iran Conflict: इराणची पाच तेलवाहू जहाजे लक्ष्य; युद्धनौकांवरील हल्ल्यांना अमेरिकेचे प्रत्युत्तर, जॉर्डनमध्येही हल्ले

Vidyanand Bapat : गणेशोत्सवावरील वक्तव्य भोवले? विद्यानंद बापटांना ४८ तासांत माफी मागण्याची नोटीस

Maharashtra Sugarcane: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ऊस गाळपाचा मुहूर्त ठरला; १५ ऑक्टोबरपासून २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम सुरू होणार

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

SCROLL FOR NEXT