Crime Sakal
पुणे

साडेतीन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या कनिष्ठ लिपीक महिलेला अटक

प्रवास भत्ता बील मंजुर करण्यासाठी साडे तीन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या सीमा विटप यांना अटक

सकाळ वृत्तसेवा

पुणे - प्रवास भत्ता (Transport Allowance) बील (Bill) मंजुर करण्यासाठी साडे तीन हजार रुपयांची लाच (Bribe) घेणाऱ्या मुळशीतील एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प कार्यालयातील कनिष्ठ लिपीक महिलेस (Women) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक (Arrested) केली.

सीमा विद्याधर विपट (वय 47) असे अटक केलेल्या कनिष्ठ लिपीक महिलेचे नाव आहे. याप्रकरणी 26 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली होती. त्यानुसार संबंधीत महिलेविरुद्ध पौड पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "एसीबी'ने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प कार्यालयात कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत.

पुणे जिल्हा परिषेदेच्या अंतर्गत या विभागाचे कामकाज चालते. या ठिकाणी सीमा विटप या कनिष्ठ लिपीक म्हणून काम करतात. तक्रारदार यांनी प्रवास भत्ता बील मंजुरीसाठी त्यांच्याकडे अर्ज केला होता. हे बील मंजूर केल्याचा मोबदला म्हणून विपट यांनी तक्रारदाराकडे टक्केवारीनुसार तीन हजार 450 रूपयांची लाच मागितली होती. त्यानुसार तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार मंगळवारी संबंधीत कार्यालयाच्या परिसरातच विपट यांना लाच घेताना अटक करण्यात आली. अतिरीक्त पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

माकडामुळे गावात ६ दिवस लॉकडाऊनसारखी स्थिती, हल्ल्यात ७० जण जखमी; ५ ते ७ जण गंभीर

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

SCROLL FOR NEXT