एकटी असल्याने महिलेचा विनयभंग
मारहाण करत मंगळसुत्राचीही चोरी; दोघांवर गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
बार्शी शहर, ता. ४ : बावी (आ) (ता. बार्शी) येथे एका विवाहितेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करून मारहाण केली आणि गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना डिसेंबर २०२५ मध्ये घडली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून प्रशांत बाबासाहेब आगलावे आणि बाबासाहेब दत्तात्रय आगलावे (दोघेही रा. बावी (आ)) यांच्यावर बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भीतीपोटी तक्रार देण्यास उशीर झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
महिलेच्या घरासमोरच आरोपीचे कुटुंब राहते. कचरा टाकण्याच्या कारणावरून त्यांची आरोपींच्या घरातील महिलेसोबत किरकोळ भांडणे झाली होती. २५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास फिर्यादीचे पती खत आणण्यासाठी स्टँडवर गेले होते. घरात एकटीच असल्याची संधी साधून सायंकाळी साडेपाचच्या सुमारास प्रशांत आगलावे आणि बाबासाहेब आगलावे हे त्यांच्या घरात घुसले. प्रशांत आगलावे याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. तर बाबासाहेब आगलावे याने मारहाण केली. यावेळी प्रशांत याने महिलेचा विनयभंग केला. महिलेने आरडाओरडा करत विरोध केला असता, झटापटीत गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने काढून घेतले. यापूर्वीच्या किरकोळ वादाच्या पार्श्वभूमीवर आणि भीतीपोटी तक्रार देण्यास उशीर झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.