पुणे

आसू - श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळेत महिला दिन संपन्न

CD

फलटणला महिला पालकांसाठी विविध स्पर्धा

महिला दिनानिमित्त आयोजन; विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण

आसू, ता. ७ : फलटण येथील महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळेत महिला पालकांच्या उपस्थितीत जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम उत्साहात झाला. या वेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या महिलांमधून चिठ्ठीद्वारे भारती उदय पुजारी या पैठणीच्या मानकरी ठरल्या.
फलटण येथील श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळेत महिला पालकांसाठी संगीत खुर्ची, तळ्यात मळ्यात, प्रश्नमंजूषा, चेंडू नेमबाजी, उखाणे, हनुमान नरसिंह ॲक्शन आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्‍घाटन संस्थेच्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय शाळा समितीच्या अध्यक्षा अलका बेडकीहाळ, इंटेरियर डिझाइनर चंदा जाधव, भूलतज्ज्ञ डॉ. सुनीता निंबाळकर, एसबीआयच्या रूपाली काकडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी श्रीराम विद्याभवनचे मुख्याध्यापक मनीष निंबाळकर, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक भिवा जगताप, बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका सुरेखा सोनवले उपस्थित होत्या.
प्रश्नमंजूषा स्पर्धेत अंजली सागर शिंदे, तळ्यात मळ्यातमध्ये पूजा नीलेश पालकर, संगीत खुर्चीत प्रमिला धायगुडे, ॲक्शन स्पर्धेत अर्चना अहिवळे, चेंडू नेमबाजीत अनिता अर्जुन पवार, उखाणा स्पर्धेत भारती उदय पुजारी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या महिलांना आकर्षक भेटवस्तू बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
स्पर्धेत सहभागी पहिल्या २० महिलांमधून चिठ्ठ्यांद्वारे पाच भाग्यवान महिला निवडण्यात आल्या. भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वितेसाठी दीपाली निंबाळकर, विजया भोसले, हेमलता गुंजवटे, नीलिमा मगदूम, शमीम शेख, निकिता कुलकर्णी, संतोषी हजारे, ज्योती शिंदे, पूजा जाधव, मीना मदने यांनी परिश्रम घेतले. दीपाली निंबाळकर यांनी सूत्रसंचालन केले.
-------------------------------
02584
फलटण : भारती पुजारी यांना पैठणी देताना अलका बेडकीहाळ, त्यावेळी अन्य विजेत्या महिला आणि शिक्षक. (अशोक सस्ते : सकाळ छायाचित्रसेवा)
-------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs NZ:'गौतम गंभीरने ठरवलं तर तो स्वतः बॅटिंगला येईल; कठीण निर्णय मी आणि कोच मिळून...', फायनलपूर्वी सूर्यकुमार स्पष्टच बोलला

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडच्या रोबोटिक्स आणि यूएव्ही सुविधेच्या भूमिपूजन समारंभाला उपस्थिती लावली

फक्त 8 दिवसांमध्ये पालटणार 3 राशींच्या रखडत्या नशिबाचा खेळ ! शुक्रादित्य राजयोगामुळे पडणार पैशांचा पाऊस

T20 World Cup : यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक बघितल्या गेलेला सामना कोणता? इंडिया-पाकिस्तान सामना राहिला तिसऱ्या क्रमांकावर...

'पूर्वेश अमर रहे'च्या घोषणांनी नागपूर हेलावले, वायुसेनेच्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT