पुणे

‘महिला, दिव्यांग शिक्षकांना निवडणूक कामातून वगळा’

CD

मंचर, ता. २९ : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कामातून महिला, दिव्यांग, तसेच गंभीर आजारी शिक्षकांना वगळण्यात यावे, अशी मागणी आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत संघाचे अध्यक्ष सचिन तोडकर, सरचिटणीस सुनील भेके, उपसभापती दत्तात्रेय मेचकर व काशिनाथ घोंगडे यांनी तहसीलदार डॉ. सचिन वाघ यांच्याकडे निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, महिला शिक्षकांना मतदान केंद्रावर मुक्कामी थांबावे लागते. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साहित्य जमा करण्यासाठी उशिरापर्यंत तहसील कार्यालयात थांबावे लागते. त्यामुळे रात्री उशिरा घरी परतताना त्यांना विविध अडचणी व सुरक्षिततेच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांना निवडणूक कामातून वगळावे. निवडणूक आयोगाने दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून वगळण्याबाबत यापूर्वी अनेकदा सूचना दिल्या असतानाही दिव्यांग शिक्षकांची नियुक्ती केली जाते. त्यामुळे त्यांना शारीरिक व मानसिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांनाही निवडणूक कामातून वगळावे. शिक्षण, कृषी, विमा, बँक, महसूल, पोस्ट आदी विभागांतील १०० टक्के पुरुष कर्मचाऱ्यांची निवडणूक कामासाठी नेमणूक केल्यास सर्व महिला शिक्षक, दिव्यांग व गंभीर आजारी शिक्षक, दिव्यांग व दुर्धर आजाराने ग्रस्त मुलांचे पालक शिक्षक, ३० जानेवारी २०२६ रोजी सेवानिवृत्त होणारे शिक्षक, दीर्घ मुदतीच्या रजेवर असलेले शिक्षक यांना निवडणूक कामातून वगळणे शक्य होईल, कर्मचाऱ्यांची कमतरता भासल्यास अत्यावश्यक परिस्थितीतच महिलांची नेमणूक स्थानिक पातळीवर करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Satej Patil Friendship: मंत्री मुश्रीफांचा फोन, सतेज पाटील यांची साथ; बाहूरन विरोध आतून मदत, गोकुळची राजकीय पेरणी

Stock Market Today: युद्धातही शेअर बाजारात तेजी कायम! सेन्सेक्स 450 अंकांनी वाढला; कोणते सेक्टर तेजीत?

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सत्ता समीकरणात मोठी उलथापालथ, भाजप अध्यक्षपदाच्या दिशेने

Mumbai News: मुंबईत मोठा अनर्थ टळला! मोटरमनच्या क्षणभराच्या चुकेने प्रवाशांचा थरकाप, भांडूप स्थानक आलं तरी लोकल थांबली नाही, काय घडलं?

Gudipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

SCROLL FOR NEXT