doctor 
पुणे

पिंपरीत डॉक्टर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न 

संदीप घिसे

पिंपरी (पुणे) : सासरच्या छळाला कंटाळून डॉक्टर विवाहितेने पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना चिंचवड येथे शुक्रवारी रात्री घडली. 

योगिता चेतन चौधरी (वय ३४, रा. शिवअंब सदन उद्योग नगर, चिंचवड) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचा पती चेतन, सासू आणि सासरे यांच्या विरोधात विवाहितेच्या छळ प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. वरिष्ठ निरीक्षक भीमराव शिंगाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, योगिता आणि तिचे पती चेतन हे दोघेही डॉक्टर आहेत. त्यांचा चिंचवड परिसरात दवाखाना आहे. फिर्यादी योगिता आणि त्यांच्या सासरकडील मंडळींमध्ये विविध कारणावरून वाद होत असे. शुक्रवारी देखील त्यांच्यामध्ये वाद झाल्याने सासरकडील मंडळींनी योगिता यांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यामुळे पोलिसांनी योगिता यांना समज दिली.

त्यानंतर रात्री नऊ वाजताच्या सुमारास योगिता घरी गेल्या. त्यांनी मुंग्या मारण्याचे औषध पाण्यामध्ये मिसळून प्यायल्या. काही वेळेनंतर सोसायटी जवळच्या किराणा दुकानात जाऊन त्यांनी ८० रुपयांचे रॉकेल बाटलीमध्ये आणले. मुंग्या मारण्याचे औषध प्यायल्याने योगिता यांना पोटात मळमळू लागले. यामुळे त्यांनी पतीला घरी बोलविले. पती चेतन यांनी योगिता यांना रागावून पुन्हा हाताने मारहाण केली. यामुळे संतापलेल्या योगिता यांनी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतले. त्यानंतर चेतन यांनी तिच्या हातातील बाटली घेत उरलेले थोडे रॉकेल योगिता व स्वतःच्या अंगावर ओतून घेतले. रागाच्या भरात योगिता यांनी पतीच्या हातातील काडीपेटी हिसकावून घेत स्वतःला पेटवून घेतले. या घटनेत योगिता या शंभर टक्के भाजल्या आहेत. त्यांना उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poland Crisis: पोलंडमध्ये सत्तापालटाच्या हालचाली? अध्यक्षांवर दौरा अर्धवट टाकून विमान माघारी वळविण्याची वेळ का आली?

Mumbai Local: मुंबई लोकलचा पुन्हा खोळंबा! हार्बर मार्गावरील ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड, वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे हाल

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामतीर्थ घाटाला भेट

ISRO Recruitment 2026: इस्रोमध्ये टेक्निकल आणि ड्रायव्हर पदांची भरती; दहावी पास अन् ITI धारकांसाठी नोकरीची सुवर्ण संधी!

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील रास्ता रोकोआधी शेतकरी नेते स्थानबद्ध; नांदूर-मधमेश्वरच्या पाण्यासाठी आंदोलन

SCROLL FOR NEXT