पुणे

कोपर्डे हवेली : महिला सक्षमीकरणातून मत्स्यपालनाला चालना.

CD

महिला सक्षमीकरणातून मत्स्यपालनाला चालना

विद्या वेताळ; पाचुंद तलावात मत्स्यबीज सोडून उपक्रमाला प्रारंभ

कोपर्डे हवेली, ता. २० : ग्रामीण महिलांना स्वयंरोजगाराची संधी मिळावी, या उद्देशाने पाचुंद तलाव येथे मत्स्यपालन उपक्रम सुरू करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्या विद्या वेताळ यांच्या हस्ते तलावात मत्स्यबीज सोडून उपक्रमाचा प्रारंभ झाला.

उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन, पंचायत समिती कऱ्हाड अंतर्गत कृष्णामाई महिला प्रभागसंघाशी संलग्न वाघजाई महिला ग्रामसंघाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. स्थानिक जलस्रोताचा योग्य वापर करून महिलांसाठी उत्पन्नाचे साधन निर्माण करणे, हा त्यामागील उद्देश आहे.
यावेळी वेताळ यांनी तलावाची पाहणी करून महिला ग्रामसंघाच्या सदस्यांशी संवाद साधला. स्थानिक संसाधनांचा योग्य वापर करून महिलांनी स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, अशा उपक्रमांना आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे त्यांनी सांगितले.
यावेळी सरपंच अरुण जाधव, तालुका अभियान व्यवस्थापक नीलेश पवार, प्रभाग समन्वयक ओंकार सावंत, लक्ष्मी जाधव, सविता मोहिते, महिला ग्रामसंघ व प्रभागसंघाच्या सदस्या, ग्रामस्थ उपस्थित होते.
-----------------------
02927
पाचुंद : तलावात मत्स्यपालन उपक्रमाचा प्रारंभ करताना विद्या वेताळ. त्यावेळी नीलेश पवार, महिला ग्रामसंघाच्या सदस्या व ग्रामस्थ. (जयंत पाटील : सकाळ छायाचित्रसेवा)
-------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची दांडी, IIM जम्मूने ५०० रुपये दंडाची पाठवली नोटीस

Coastal Road Accident: BMW फ्लायओव्हरवरून खाली कशी कोसळली? धक्कादायक घटनेचा CCTV व्हायरल

UPI Transaction Fee : ऑनलाइन व्यवहारांना लागणार ब्रेक? केंद्र सरकारच्या निर्णयामुळं शेतकऱ्यांना बसणार लाखो रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड, UPI शुल्क बदलामुळं वाढली चिंता

SMRITI MANDHANA: सुजी बेट्सला मागे टाकलं अन् स्मृती मंधानाने रचला इतिहास! महिला T20I मध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली

Vastu Benefits of Shankh: घरात शंख ठेवण्याचे 'हे' आहेत फायदे; वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या शंखाचा योग्य प्रकार अन् दिशा!

SCROLL FOR NEXT