MHD26B05009
अकोला-वासूद (ता. सांगोला) : येथील सरदार श्यामराव लिगाडे विद्यालयात आयोजित कायदेविषयक शिबिरात मार्गदर्शन करताना.......... यावेळी उपस्थित इतर.
वासूदमधील लिगाडे विद्यालयात
कायदेविषयक शिबिर उत्साहात
.........
महूद, ता. ३० : अकोला-वासूद (ता. सांगोला) येथील सरदार श्यामराव लिगाडे विद्यालय व भाई जगन्नाथराव लिगाडे ज्युनिअर कॉलेजमध्ये महिला सक्षमीकरण व न्यायाची उपलब्धता या विषयावर कायदेविषयक शिबिर उत्साहात पार पडले. सांगोला तालुका विधी सेवा समिती व विधिज्ञ सेवा संघाच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
महिला व मुलींचे सक्षमीकरण हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. बेटी बचाओ, बेटी पढाओ या विषयावर ॲड. एच. डी. मेनकुदळे-घोंगडे यांनी मार्गदर्शन केले. तर सुकन्या समृद्धी योजना या विषयावर सांगोला पोस्ट ऑफीस मधील डी. एम. इंगळे यांनी मार्गदर्शन केले. मुलींना सक्षमीकरण व न्यायाची उपलब्धता या विषयावर ऋतुजा शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी सांगोला विधीज्ञ संघाचे उपाध्यक्ष ॲड. एस. बी. दिवसे, ॲड. एस. व्ही. बोत्रे, ॲड. एच. डी. मेनकुदळे, ॲड. एन. एम. जवंजाळ, पर्यवेक्षक श्री. व्यवहारे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन ॲड. जी. एम. खटाकळे यांनी केले. तर डी. टी. घोरपडे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.