पुणे

आंबेगाव तालुक्यातील निराधार विधवा महिलांचा सन्मान

CD

मंचर, ता. १० : जागतिक महिला दिनानिमित्ताने आंबेगाव तालुक्यातील निराधार विधवा महिलांचा मंचर येथे सन्मान करण्यात आला. मंचर येथील मैत्री हेल्थकेअर फाउंडेशनच्या पुढाकाराने आयोजित कार्यक्रमात २५ महिलांना ब्लँकेट व प्रमाणपत्रदेऊन गौरविण्यात आले.
महिलांच्या जीवनात खऱ्या अर्थाने आनंद निर्माण करण्यासाठी तसेच त्यांना मायेची ऊब देण्यासाठी फाउंडेशनने घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
मंचर येथे मागील आठ वर्षांपासून मैत्री हेल्थकेअर फाउंडेशन विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. रक्तदान शिबिर, मोफत वैद्यकीय तपासण्या, गरीब रुग्णांना मोफत रक्त पिशव्या, लहान मुलांसाठी संस्कार शिबिर यांसारख्या अनेक उपक्रमांमध्ये फाउंडेशनचा सक्रिय सहभाग असतो, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब पोखरकर व सचिव प्रिया पोखरकर यांनी दिली.
यावेळी महिलांचा सन्मान होताच त्या भारावून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. ‘तुमच्या सुख-दुःखात आम्ही सदैव सोबत राहू,’ अशी ग्वाही फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी महिलांना दिली.
संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पोखरकर, सचिव प्रिया पोखरकर, ॲड. शुभांगी पोटे, गौरी पोखरकर, विना पोखरकर यांच्या हस्ते महिलांचा सन्मान केला. सुषमा थोरात, कोमल देशमुख, कावेरी कस्तुरे व फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यवस्था पाहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT