मंचर, ता. ५ : महिला सक्षमीकरणातील उल्लेखनीय कार्याबद्दल आंबेगाव तालुक्यातील निघोटवाडी ग्रामपंचायतीला पुणे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय ‘आदिशक्ती’ प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. पाच लाख व एक लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असल्याची माहिती सरपंच नवनाथ निघोट यांनी दिली.
महिला व बालविकास विभागामार्फत सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रभावी काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना हा गौरव दिला जातो. निघोटवाडीने आरोग्य, पोषण आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. विशेषतः कुपोषण व मातामृत्यू रोखण्यासाठी राबविलेले उपक्रम आणि बचत गटांच्या माध्यमातून महिलांना उपलब्ध करून दिलेला रोजगार यामुळे गावाची निवड झाली आहे.
ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांमुळे गावात २०१ महिला ‘लखपती दीदी’ बनल्या असून ८८ नवीन बचत गटांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच १,९९० महिलांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधोपचार पुरविण्यात आले. मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षणही दिले जात असल्याची माहिती ग्रामाधिकारी सचिन नवले यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.