लोगो : अकलूज नगरपरिषद
---
YSH26B05096
---
महिला बचत गटाच्या माध्यमातून गृहउद्योग उभारणार
अकलूज : माझ्या प्रभागात १०/७० झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीत सुमारे ७० कुटुंबं राहात असून, या सर्व कुटुंबांना घरकुल योजनेतून पक्की घरे मिळवून देणार आहे. त्याचप्रमाणे प्रभागातील सुशिक्षित महिला व युवक वर्गाच्या हाताला काम मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. महिलांचे बचत गट काढून त्यांना गृहउद्योग उभारून उद्योजक बनविण्याचा माझा मानस आहे. त्याचप्रमाणे युवक वर्गासाठीही वेगवेगळे व्यवसाय कसे उभे करता येतील याकडे आपला कल राहील. प्रभागात काही ठिकाणी पथदिवे नाहीत, त्याचप्रमाणे पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्थापन याकडे विशेष लक्ष देणार आहे. प्रभागातील रस्ते खड्डेमुक्त करणार आहे. प्रभागात असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचाही मानस आहे.
- दीपाली वाघमोडे, नगरसेविका, अकलूज नगरपरिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.