कॅम्पस ः छत्रपती संभाजीनगर
बेंदवाडी येथे महिला कृषी
मेळावा उत्साहात
-----------------------
बेंदवाडी, जि. छत्रपती संभाजीनगर ः दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत महिला शेतकरी मेळावा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. बैनाडे, उपप्राचार्य डॉ. पी. बी.कर्डिले यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमात डॉ. विशाल धुमाळ यांनी दुग्धजन्य पदार्थ निर्मितीच्या आधुनिक पद्धती व त्यामधील मूल्यवर्धनाच्या संधी याविषयी माहिती दिली. प्रा. ए. आर. पगार यांनी केंद्र व राज्य शासनाच्या नवीन कृषी योजनांची माहिती देत त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. प्रा. व्ही. सी. राणे यांनी फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योग, मूल्यवर्धन आणि ग्रामीण भागातील उद्योजकतेच्या संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या मेळाव्याला महिला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत माहिती घेतली. अशा कार्यक्रमांमधून महिलांमध्ये आधुनिक शेती, मूल्यवर्धन व शासकीय योजनांबाबत जागरूकता निर्माण होत असल्याची भावना या वेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. बी. बडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या कृषिकन्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी प्रा. के. पी. बेडवाल, ए. व्ही. गाढवे व डॉ. एस. जे. मखमले आदी उपस्थित होते.
फोटो ः
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.