पुणे

आद्यरेषीय पीक प्रात्यक्षिकांसाठी ज्वारीच्या परभणी शक्ती वाणाचे बियाणे वाटप

CD

ज्वारीच्या परभणी शक्ती
वाणाचे बियाणे वाटप

कृषी विज्ञान केंद्रातर्फे खडका येथे ‘शेती वाचवा’ अभियान

परभणी ः परभणी येथील कृषी विज्ञान केंद्र आणि महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत सोनपेठ येथील सर्वोदय लोकसंचालित साधन केंद्रातर्फे ‘शेती वाचवा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शनिवारी (ता. २४) खडका (ता. सोनपेठ) येथे आद्यरेषा पीक प्रात्यक्षिकांतर्गत ज्वारीच्या जैवसंपृप्त ‘परभणी शक्ती’ वाणाच्या बियाण्याचे महिला शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळावी आणि शेती अधिक फायदेशीर व्हावी, या उद्देशाने जिल्ह्यात २२ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत हे अभियान राबविण्यात येत आहे.
खडका येथे आयोजित कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्राच्या विशेषज्ञ डॉ. अरुणा खरवडे, डॉ. अमोल काकडे, सवाईसिंग निठारवाल, सर्वोदय लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक नसीम सय्यद, आशा यादव आदी उपस्थित होते.
या वेळी महिला शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, दैनंदिन आहारात जैवसंपृक्त पिकांचे महत्त्व, रब्बी हंगामातील पिकांची लागवड तसेच कीड व रोग व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अभियानांतर्गत सध्याच्या परिस्थितीत घ्यावयाची पिके, लागवड तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन आणि जलसंधारण यांचीही माहिती देण्यात आली.
महिला शेतकऱ्यांनी शेती करताना येणाऱ्या अडचणी, विविध समस्या आणि स्वतःचे अनुभव मांडले. शेती क्षेत्रातील महिलांचे योगदान, त्यांचे कष्ट आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासातील त्यांची भूमिका यावरही चर्चा करण्यात आली.

फोटो ओळी ----
परभणी ः महिलांना ज्वारीच्या परभणी शक्ती वाणाचे बियाणे वाटप करण्यात आले. या वेळी विशेषज्ञ डॉ. अरुणा खरवडे, सवाईसिंग निठारवाल, डॉ. अमोल काकडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत जागतिक दर्जाचे मरीना उभारणार, ९२३ कोटींचा प्रकल्पाची घोषणा; सुरक्षिततेला प्राधान्य

Beed Crime : चमत्काराचा बहाणा करून वृद्धाला लुबाडणारा सराईत जेरबंद; परळी बसस्थानकातील अंगठी लांबवणाऱ्या नाशिकच्या ठगास एलसीबीच्या बेड्या

Maharashtra Live News: छत्रपती कारखान्याचे १५ दिवसात १ लाख ७३५३ टन उसाचे गाळप

E-Bus Fire : पुण्यात चालत्या ई-बसला आग; १७ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला!

दिल्लीतील धुक्याचा भारत श्रीलंका वनडे सामन्याला फटका बसणार? रोहित विराटच्या चाहत्यांची धाकधूक वाढली, सामना दुसरीकडे हलवण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT