कायद्याचे ज्ञान महिलांना सक्षम बनवेल
न्या. विक्रम आव्हाड; आखाडेत कायदेविषयक जनजागृती शिबिर
कुसुंबी, ता. २२ : महिलांसंदर्भातील कायद्यांची माहिती लोकांना नसल्यामुळे विविध प्रकारच्या अन्याय अत्याचारास सामोरे जावे लागते. अन्याय होण्यापूर्वी त्याला प्रतिबंध करणे महत्त्वाचे आहे. यासाठी कायदेसंदर्भातील ज्ञान महिलांना सक्षम बनविणारे ठरेल, असे प्रतिपादन मेढा न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. विक्रम आव्हाड यांनी केले.
आखाडे (ता. जावळी) येथे मेढा न्यायालय व जावळी तालुका वकील संघाच्या वतीने कायदेविषयक जनजागृती शिबिरात आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डॉ. संगीता आव्हाड, पंचायत समितीचे आर. एस. जगताप, पंचायत समिती सदस्या शिल्पा शिंदे, जावळी तालुका वकील संघाचे अध्यक्ष आर. एस. पोफळे, आर. आर. पवार, एन. एस. पवार, पी. डी. गोरे, एस. वाय. निकम, वाय. ए. निकम, एन. ए. सरकाळे मेरी सोमर्डी ग्रामीण रुग्णालय चे वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मी मीना, ग्रामविकास अधिकारी आखाडे, जयश्री माजगावकर, हेमलता आखाडे उपस्थित होते.
संगीता आव्हाड म्हणाल्या, ‘‘भारतीय राज्यघटनेने आपल्या आदर्श नियमावलीत महिलांविषयक नियमांना महत्त्वपूर्ण स्थान देऊन महिला उन्नतीसाठी अनेक कायद्यांची निर्मिती केली आहे. या सर्व कायद्यांची ओळख करून घेतल्याने महिलांचे जीवन सुखी व संपन्न होण्याबरोबरच त्यांच्या जीवनाला स्थैर्य लाभणार आहे, त्यामुळे महिलांनी आपल्यासंदर्भात करण्यात आलेले कायदे, त्यातील तरतुदी डोळसपणे लक्षात घ्याव्यात.’’
या शिबिरात रक्तदाब, शुगर, महिलांचे आरोग्यविषयक समस्या, रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण ९० महिला व पुरुष लाभार्थ्यांनी लाभ घेतला. त्यांना त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांवर उपचार करून औषधे देण्यात आली. पी. डी. गोरे, जयश्री माजगावकर यांनी मार्गदर्शन केले. मेरी एंजल्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षिका स्नेहल जाधव यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. योगेश निकम यांनी आभार मानले.
01422
आखाडे : कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. विक्रम आव्हाड. समवेत संगीता आव्हाड व शिक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.