Murder sakal
पुणे

Pune Crime : बुधवार पेठेत मोबाईल चोरीच्या संशयावरून महिलेचा खून; दोघांना अटक

मोबाईल चोरल्याच्या संशयावरून महिलेला बांबूने मारहाण करून खून केल्याची घटना बुधवार पेठेत घडली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मोबाईल चोरल्याच्या संशयावरून महिलेला बांबूने मारहाण करून खून केल्याची घटना बुधवार पेठेत घडली. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी दोघांना अटक केली. बुधवार पेठेत गेल्या दोन दिवसांत खून झाल्याची ही दुसरी घटना आहे.

वर्षा शिवाजी थोरात (वय २५, रा. दांडेकर पुलाजवळ, पर्वती) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी गौरव राजू चौगुले (वय २१, रा. कसबा पेठ) आणि अब्दुल मेहबूब सय्यद (वय ३४, रा. बुधवार पेठ) या दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. याबाबत आनंद सोनवणे (वय ३०, रा. ढमढेरे गल्ली, बुधवार पेठ) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल सय्यदची अंडा भुर्जीची गाडी आहे. वर्षा थोरात फिरस्ती आहे. वर्षा सोमवारी (ता. १२) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास श्रीनाथ चित्रपटगृहासमोर चहा पिण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपींनी तिला मोबाईल चोरल्याच्या संशयावरून बांबूने बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक वैभव गायकवाड करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B Visa US Rules : डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक मोठा झटका देण्याच्या तयारीत; H-1B व्हिसा पूर्णपणे बंद होणार?

Rohit Sharma Video: रोहित टीम बसमधून उतरताना पाय घसरून पडला, पोलिसांसह सारे सावरायला धावले; विराट लांब उभा राहून फक्त...

अभिनेत्री रकुलप्रीत सिंगच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी; चित्रपटांच्या नावाखाली परदेशात पैसा पाठवत असल्याचा संशय

दुष्काळाच्या झळा! सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Latest Marathi News Live Update : पाण्यासाठी शेतकऱ्यांनी ग्रामस्थांचा रास्ता रोको.. पाण्यासाठी मेंढ्याही रस्त्यावर

SCROLL FOR NEXT