women 
पुणे

कोरोनासोबत कसे जगायचे ते महिलांनीही शिकावे - स्मिता जोशी

सकाळवृत्तसेवा

पुणे : "कोरोनासोबत कसे जगायचे ते महिलांनीही शिकणे आवश्यक आहे. त्यासाठी मानसिक शक्ती वाढवणे गरजेचे आहे. काळानुरूप आणि कोरोनामुळे झालेले बदल स्वीकारून ते अंगीकारले पाहिजे, असा सल्ला कौटुंबिक न्यायालयातील ज्येष्ठ समुपदेशक स्मिता जोशी यांनी महिलांना दिला.

'भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय, न्यू लॉ कॉलेज' आणि ' वंचित विकास' यांच्या संयुक्त विद्यमाने 'महिला अधिकार व कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे महिलांच्या मानसिक स्वास्थ्यावर होणारा परिणाम' या ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या जोशी यांनी मार्गदर्शन केले. कॉलेजमधील ' मोफत कायदा सल्ला केंद्रा' च्या प्रमुख डॉ. सपना देव, सागर शेळके यांनी देखील आपले विचार मांडले. 

न्यु लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य डॉ. भाग्यश्री देशपांडे यांनी कॉलेजमध्ये चालणाऱ्या मोफतकायदा सल्ला केंद्रची माहिती सांगितली. तसेच कार्यशाळेच्या विषयाचे गांभीर्यसमजावून सांगितले. त्या म्हणाल्या, “महिलांना पण मदतीची गरज असते. कठीण प्रसंगी संवादसाधने आवश्यक आहे. संवाद साधला तर आपल्याला येणाऱ्या समस्या दूर करू शकतो."

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डॉ. सपना देव म्हणाल्या, "कोविड-19 च्या काळात नोकरी करत असलेल्या महिलांना पगार हा ठरल्या प्रमाणेच द्यायला हवा. या काळात महिलेची घरात छळवणूक झाल्याचे प्रकार वाढले आहेत. अशा वेळी तिने खंबीर होवून घरातून निघून ना जाता परिस्थितीचा सामना केला पाहिजे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शेळके यांनी निराधार महिलांसाठी शासनाच्या कोणत्या योजना आहेत त्या समजून सांगितल्या. तसेच त्यांच्यासाठी असलेल्या अनुदानाची माहिती दिली. कार्यशाळेत सहभागी झालेल्या महिलांना कौटुंबिक हिंसाचार कायदा, हिंदू दत्तक तथा भरण पोषण अधिनियम कायद्याविषयी माहिती आणि महिलांनी उपस्थिती केलेल्या प्रश्नांची उत्तरे यावेळी देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT