पुणे

पारनेर - महिला प्रवासी आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलत वाढ.

CD

टुडे एकसाठी अँकर
एसटी बस आणि स्मार्ट कार्डचा फोटो टाकावा

३१ डिसेंबरपर्यंत स्मार्ट कार्डला शिथिलता
एसटी महामंडळाचा निर्णय; सणासुदीत महिला प्रवाशांना दिलासा
पारनेर, ता. ७ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी एनसीएमसी (एनसीएमसी) स्मार्ट कार्डच्या सक्तीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. स्मार्ट कार्डची अनिवार्यता ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत शिथिल करण्यात आल्याने राज्यातील महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती पारनेरचे आगार प्रमुख अमोल कोतकर यांनी दिली.
महिलांना एसटी प्रवासात सवलतीचा लाभ सहजपणे मिळावा आणि त्यांच्या प्रवासात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यादृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. विशेषतः ग्रामीण भागातील महिला, रोजंदारीने काम करणाऱ्या महिला, नोकरदार महिला, विद्यार्थिनी, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटीचा प्रवास हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अशा परिस्थितीत स्मार्ट कार्डच्या सक्तीला मुदतवाढ मिळाल्याने महिला प्रवाशांची सणासुदीच्या दिवसांत गैरसोय टळण्यास मदत होणार आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यात एसटी महामंडळाची सेवा सर्वसामान्य नागरिकांना जोडणारी जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. आर्थिकदृष्ट्या परवडणारा प्रवास, ग्रामीण भागातील दळणवळण आणि महिलांना मिळणारी प्रवास सवलत, यामुळे एसटीने समाजातील सर्व घटकांशी आपले नाते अधिक दृढ केले आहे.
एनसीएमसी स्मार्ट कार्ड ही डिजिटल सुविधांच्या दिशेने टाकलेली महत्त्वपूर्ण पायरी असली, तरी या व्यवस्थेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने होणे आवश्यक आहे. स्मार्ट कार्ड सक्तीला ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत शिथिलता देण्याचा निर्णय म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करतानाच सर्वसामान्य महिला प्रवाशांच्या सोयीला प्राधान्य देणारे पाऊल आहे.
महिलांना प्रवास सवलत देणे म्हणजे केवळ आर्थिक लाभ देणे नव्हे, तर त्यांच्या स्वावलंबनाला, सुरक्षित प्रवासाला आणि सामाजिक सहभागाला बळ देणे होय.

कोट-----
एसटी महामंडळाची सेवा आणि महिलांसाठीची प्रवास सवलत यांचा समन्वय कायम राहिल्यास सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील महिलांचा विश्वास अधिक दृढ होईल. डिजिटल परिवर्तनाच्या प्रक्रियेत प्रवाशांची सोय आणि सवलतींचे सातत्य जपण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरत आहे.
- अमोल कोतकर, आगार प्रमुख,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'गोकुळ'वर ताबा मिळवण्याचा प्रश्नच नाही! CM फडणवीसांनी सांगितलं संचालक नेमण्यामागचं नेमकं कारण

Maharashtra Board SSC HSC Exam Timetable 2027 : दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर! 'या' तारखेपासून होणार परिक्षा सुरु

IND vs NZ: दोन सिक्स अन् रोहित शर्माने मोडीत काढला शाहिद आफ्रिदीचा विक्रम! या खास यादीत 'हिटमॅन' नंबर-१

Trending News: ज्याने नोकरी दिली, त्याचेच 170 कोटी लुटले! महिलेचा घरातील अजब कारनामा पाहून पोलीसही चक्रावले

BAN vs WI, Test: १८४ वर ७ बाद... अन् मग तोहीद हृदोयची डबल सेंच्युरी! तिसराच सामना खेळताना बांगलादेशला दिली आघाडी

SCROLL FOR NEXT