पुणे

दिवाळी बोनस वाटपात महिलांची बाजी

CD

पारगाव, ता. १७ : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या दिवाळी बोनस वितरणात महिला शेतकऱ्यांनी बाजी मारली आहे. पहिल्या पाचही क्रमांकांवर महिलांनी नाव कोरले आहे. सुजाता शशिकांत टाव्हरे यांना सर्वाधिक ६९ हजार ५५० रुपये बोनस मिळाला आहे. संस्थेच्या सर्व सभासदांना एकूण १० लाख रुपयांचे वाटप करण्यात आले.
भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक शांताराम बाप्पू हिंगे, सरपंच सारिका हिंगे, उपसरपंच अनिल हिंगे, मेंगडेवाडीचे सरपंच बाळासाहेब मेंगडे यांच्या हस्ते हे वाटप झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संभाजी हिंगे पाटील, उपाध्यक्ष हनुमंत वाघ, सचिव विकास हिंगे व संचालक उपस्थित होते. ग्रामीण भागातील महिला दुग्ध व्यवसायातून आर्थिक स्वावलंबनाचा आदर्श निर्माण करत असल्याचे या यशातून दिसून आले. महिला शेतकऱ्यांना तब्बल ७० हजार रुपयांपर्यंत बोनस मिळाल्याने त्यांच्या यशाचे परिसरातून कौतुक होत आहे..

बोनस मिळवणाऱ्या प्रथम पाच महिला
१. सुजाता शशिकांत टाव्हरे ............६९,५५० रु.
२. सीमा संदेश हिंगे पाटील ............५७,५८२ रु.
३. शीतल संदेश टाव्हरे............५२,५९५ रु.
४. सुरेखा हनुमंत वाघ............४८,०५७ रु.
५. सुनिता संभाजी हिंगे पाटील............४३,३९५ रु.


पुणे (कात्रज) जिल्हा सहकारी दूध उत्पादक संस्थेचे संचालक विष्णू काका हिंगे पाटील यांचा मार्गदर्शनाखाली दरवर्षी संस्था दूध उत्पादकांना दिवाळी बोनसचे वाटप करते. यावर्षी तब्बल १० लाख रुपयांचा बोनस वाटप करण्यात आला. त्यामध्ये संस्थेच्या वतीने एक रुपये पन्नास पैसे व पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संस्थेचे वतीने एक रुपया अशा प्रकारे प्रतिलिटर दोन रुपये पन्नास पैसे बोनस वाटप करण्यात आला.
संभाजी हिंगे पाटील, अध्यक्ष, अवसरी दूध संस्था)
07684

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL मधील निवृत्तीनंतर शेअर बाजारात एन्ट्री; धोनीची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा लवकरच येणार IPO

Cabinet Decision: शिक्षण क्षेत्रापासून न्यायालयापर्यंत, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ धडाकेबाज निर्णय

Gurnoor Brar: भारताच्या गुरनूर ब्रारला ICC कडून मोठी शिक्षा! वनडेतील भांडण पडलं महागात

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्रीनं दिली गुडन्यूज! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Latest Marathi News Live Update : गिरीश महाजन संकटमोचक, पण लय लफडेबाज; गुलाबराव पाटलांची फटकेबाजी

SCROLL FOR NEXT