corona 
पुणे

धक्कादायक, उरुळीतील पदाधिकारी महिलेच्या स्वॅबचे परस्परविरोधी अहवाल 

जनार्दन दांडगे

उरुळी कांचन (पुणे) : पंचायत राज व्यवस्थेत काम करणाऱ्या उरुळी कांचन येथील एका राजकीय महिला पदाधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली की नाही, या तपासणीसाठी संबधित महिलेचा स्वॅब (घशातील द्राव) पुणे शहरातील दोन वेगवेगळ्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. मात्र, दोन्ही प्रयोगशाळांनी संबधित महिलेचे स्वॅबचे तपासणी अहवाल परस्परविरोधी दिले आहेत. त्ल्यायामुळे संबंधित महिला पदाधिकारी कोरोना पॉझिटिव्ह की, निगेटिव्ह याबद्दल संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

उरुळी कांचन येथील एका राजकीय महिला पदाधिकाऱ्यास कोरोनाची प्राथमिक लक्षणे जाणवू लागल्याने लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पीटल या खासगी रुग्णालय प्रशासनाने संबधित महिलेचा स्वॅब तपासनीसाठी सोमवारी (ता. ८) रात्री उशिरा हडपसर व पुणे येथील दोन वेगवेगळ्या प्रयोगशाळेत पाठवला होता. या दोन्ही प्रयोगशाळेपैकी पुणे येथील प्रयोगशाळेने संबधित महिला पॉझिटिव्ह, तर हडपसर येथील प्रयोगशाळेने महिला कोरोना निगेटिव्ह असल्याचा अहवाल दिला आहे. एकाच महिलेचा अहवाल वेगवेगळा मिळाल्याने नेमक्या कोणत्या प्रयोगशाळेचा अहवाल ग्राह्य धरावयाचा, हा मोठा प्रश्न रुग्णालय व्यवस्थापनापुढे निर्माण झाला आहे. तसेच, दोन्ही प्रयोगशाळांनी आपलाच अहवाल बिनचूक असल्याचा दावा केला आहे.  

याबाबत विश्वराज हॉस्पीटलचे व्यवस्थापक डॉ. पी. के. देशमुख यांनी सांगितले की, सरकारने या दोन्ही प्रयोगशाळांना स्वॅब तपासणीची अधिकृत परवानगी दिलेली आहे. पुणे येथील प्रयोगशाळेचे टायअप महानगरपालिकेशी आहे, तर हडपसर येथील प्रयोगशाळेचे टायअप शासनाशी आहे. त्यामुळेच आमच्या रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी दोन्ही प्रयोगशाळेत पाठवत आहोत. उरुळी कांचन येथील महिला रुग्णाच्या स्वॅबचा अहवाल परस्परविरोधी आला आहे.  उद्या (गुरुवारी) पुन्हा एकदा संबधित महिलेचे स्वॅब शासकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. शासकीय प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच पुढील दिशा ठरवली जाणार आहे. 

दरम्यान, या महिलेच्या संपर्कात आलेले तिचे तीन मुलगे व इतर अकरा जण, अशा चौदा जणांचे कोरोना अहवालही बुधवारी उशिरा निगेटिव्ह आले आहेत.

विश्वराज हॉस्पीटलच्या व्यवस्थापकीय संचालिका ड़ॉ. आदीती कराड म्हणाल्या की, शासकीय मान्यता असलेल्या प्रयोगशाळांचे एकाच महिलेचे अहवाल परस्परविरोधी येतात, ही बाब धक्कादायक आहे. संबधित महिलेचा स्वॅब शासकीय प्रयोगशाळेत पाठवला जाणार आहे. शासकीय प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर, चुकीचा अहवाल देणाऱ्या प्रयोगशाळेवर चुकीचा अहवाल दिल्याबद्दल कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway: मिसिंग लिंकनंतर पहिल्यांदाच द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी, कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची गर्दी

Pune BJP Woman Leader: पुण्यातील महिला भाजप नेत्याचं निधन, वयाच्या ६०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pune Highway Accident: मुंबई बंगळूर हायवेवर भीषण अपघात, टाटा अल्ट्रोजचा चुराडा; मुंबईच्या दोघांचा मृत्यू, १२ जण जखमी

पद्मिनी कोल्हापूरे-प्रीती सप्रू रस्त्यावरच कचाकचा भांडल्या; संतापलेल्या पोलिसांनी सुनावलं, Viral Video

Mongoose satire story : मुंगूस आणि पाळलेला माणूस

SCROLL FOR NEXT