पुणे

दृष्टिहीनांसाठी नितीन देसाईंचे कार्य पुढे नेऊ

CD

मार्केट यार्ड, ता. १० : ‘‘दृष्टिहीन नागरिकांसाठी स्व. नितीन देसाई यांनी केलेल्या संवेदनशील कार्याचा वसा पुढे चालविण्याची जबाबदारी आपल्यावर असून ती समर्थपणे पार पाडण्याचा प्रयत्न करू,’’ असे प्रतिपादन दि पूना गुजराती केळवणी मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेश शहा यांनी केले.
दि पूना गुजराती केळवणी मंडळाच्या हरिभाई व्ही. देसाई कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त जन्मतः दृष्टिहीन असूनही विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना ‘नारी शक्ती-अंतर्दृष्टी विशेष सन्मान’ प्रदान करण्यात आला. त्यामध्ये गायिका व शिक्षिका दीपमाला लोहाडे, सामाजिक कार्यकर्त्या सकीना बेदी, उद्योजिका रुक्मिणी राजपूत आणि बीटवाईज कंपनीच्या प्रबंधक दिव्या थोरात यांचा सन्मान करण्यात आला.
शिकारपूर सोशल फाउंडेशन, रोटरी इंटरनॅशनल क्लब ३१३१ आणि हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला कायनेटिक इंजिनिअरिंग ग्रुपच्या संचालिका डॉ. जयश्री अरुण फिरोदिया, माहिती व तंत्रज्ञान तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर आणि निवांत अंधमुक्त विकासालयाच्या संस्थापक संचालिका मीरा बडवे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. अर्चना पंडित यांनी स्वागत, तर क्रांती शहा यांनी सूत्रसंचालन केले. ज्योती मालुसरे, प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

Pune Fraud News : बांधकाम व्यावसायिक महिलेची पावणेसहा कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : माढा तालुका पंचायत समितीवर भाजप आणि अजित पवार गटाची सत्ता

Kirit Somaiya : बांगलादेशींना शोधण्यासाठी तीन वर्षातील जन्मदाखले तपासा; किरीट सोमय्या यांनी घेतली महापालिकेत बैठक

Naresh Mhaske : सुज्ञ जनतेने काँग्रेस आणि आघाडीला धुळ चारली; नरेश म्हस्के यांचे विरोधकांवर टीकास्त्र

SCROLL FOR NEXT