पुणे

‘महिला आरक्षणाची अंमलबजावणी का नाही’

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता.८ ः ‘‘महिला आरक्षण विधेयक २०२३ मध्ये मंजूर झाले होते. त्यावेळी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा दिला होता. मात्र तीन वर्षे उलटली तरी या विधेयकाची अंमलबजावणी का झालेली नाही,’’ अशी विचारणा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांना केली.
या विधेयकाला विनाकारण मतदारसंघ फेररचनेशी जोडले जात असल्याचा आरोप गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे. महिलांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसल्यामुळे देश मागे राहिला असल्याचे मत गांधी काही दिवसांपूर्वी व्यक्त केले होते. त्यावर गांधी यांचे हे विधान म्हणजे काँग्रेसकडून आलेला सकारात्मक संदेश आहे. महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेस कोणत्याही अटींशिवाय समर्थन देईल, अशी आशा असल्याचे रिजिजू यांनी म्हणाले होते.
काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांचा महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा असला तरी मतदारसंघ फेररचनेशी हा मुद्दा जोडण्यास त्यांचा विरोध आहे. मतदारसंघ फेररचनेच्या माध्यमातून लोकसभेतील जागांची संख्या वाढवली जाण्याचा प्रस्ताव आहे. महिला आरक्षणाचा मुद्दा मतदारसंघ पुनर्रचनेशी जोडला जाऊ नये, असे विरोधकांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्यांच्या ठसक्याने रंगायचा लावणीचा फड! त्या शकुंतलाताई नगरकर काळाच्या पडद्याआड, कलाविश्वावर शोककळा

Latur Water Crisis : उजनी’ची व्यवहार्यता लालफितीतच; मुख्यमंत्र्यांना लातूरचा दुष्काळ अवगत; पण दहा वर्षांत शाश्वत उपाययोजनाच नाही

Vidarbha Orange Alert : विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता पुणे घाटमाथ्याला ‘यलो अलर्ट’

Asian Games 2026: भारताची नारी शक्ती! नेमबाजांनी जिंकलं कांस्य; मनू भाकरला अपयश पण, कबड्डीत महिलांची बाजी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूरमध्ये दाखल

SCROLL FOR NEXT