पुणे

महिला वरिष्ठ गट टी-२० क्रिकेट

CD

गुलटेकडी ः कटारिया प्रशालेच्या मैदानावर झालेल्या महिलांच्या एमसीए वरिष्ट गट निमंत्रित टी-२० क्रिकेट स्पर्धेत केजेसीएच्या एकता नानगुडेने झोराष्ट्रीयन क्लबच्या दामिनी बनकरला त्रिफळाबाद केले तो क्षण.
-------------------
डीव्हीसीए आणी केजेसीए संघांचा अंतिम फेरीत प्रवेश
महिला वरिष्ठ गट टी-२० क्रिकेट

पुणे, ता. १९ ः महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) आयोजित महिलांच्या एमसीए वरिष्ठ गट निमंत्रित टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी (डीव्हीसीए) आणी केदार जाधव क्रिकेट अकादमीने (केजेसीए) आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय प्राप्त करित आगेकूच केली आहे.
गुलटेकडी येथील कटारिया प्रशालेच्या मैदानावर झालेल्या लढतीत सुहानी कहांडळचे अर्धशतक आणि शरयू कुलकर्णी, पूनम खेमनारच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर केदार जाधव क्रिकेट अकादमीने (केजेसीए) उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत झोरास्ट्रियन संघावर ३८ धावांनी मात केली. प्रथम फलंदाजी करताना केजेसीएने पाच बाद १७० धावा केल्या. त्यात महत्त्वाचा वाटा सुहानी कहांडळने ३८ चेंडूंत तेरा चौकार व दोन षटकारांसह केलेल्या ७८ धावांचा होता. तिला रोहिणी मानेने पाच चौकारांसह ४३ धावांची खेळी करत सुरेख साथ दिली. ईशा पठारेने दोन गडी बाद केले. प्रत्युत्तर देताना झोरास्ट्रियन क्लबला सात बाद १३२ धावा करता आल्या. त्यांच्या तन्वी गुप्तेने पाच चौकार व दोन षटकारांसह ४४ चेंडूंत केलेली ५१ धावांची खेळी अपुरी पडली. शरयू कुलकर्णीने तीन, तर पूनम खेमनारने दोन गडी बाद केले.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत शिवाली शिंदेने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिलीप वेंगसरकर अकादमीने ‘बीव्हीजे’ संघावर तीस धावांनी विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना डीव्हीसीए संघाने चार बाद १६९ धावा केल्या. त्यात प्रमुख वाटा शिवाली शिंदेने ४० चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह केलेल्या ६८ धावांचा होता. तिला महेक मुल्ला व निकितासिंहने सुरेख साथ दिली. संजीवनी पवारने दोन गडी बाद केले. प्रत्युत्तर देताना बीव्हीजे संघाला ७ बाद १३९ धावा करता आल्या. त्यांच्या आयेशा शेखने सात चौकार आणि चार षटकारांसह ४३ चेंडूंत केलेली ७३ धावांची खेळी अपुरी पडली. स्वाजंली मुळे व आचल अगरवालने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
------------------
महिला वरिष्ट गट टी-२० क्रिकेट जोड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा मात्र 'या' चार जिल्ह्यांत पाऊस धोधो कोसळणार; तुमच्या भागात आज कसे असेल हवामान? जाणून घ्या

IND vs WI, T20I: श्रेयस अय्यरचे विक्रमी शतक! रोहित-सूर्यालाही जे जमलं नव्हतं, ते करून दाखवलंय

आजचे राशिभविष्य - 07 सप्टेंबर 2026

Egg Recipe: अंडे, चीज अन् क्रीमी सॉसची भन्नाट मेजवानी; १० मिनिटांत बनवा व्हायरल 'कोरियन एग ड्रॉप सँडविच'!

National Pickleball Championship 2026: महाराष्ट्राच्या खेळाडूंचे कोचीमध्ये वर्चस्व! सर्व श्रेणींमध्ये मिळवले संघ अजिंक्यपद!

SCROLL FOR NEXT