womens team of Giripremi successfully climbed 6,529 meter high peak of Mount Sudarshan Garhwal Himalayas Sakal
पुणे

Mount Sudarshan : ‘गिरिप्रेमी’च्या महिला संघाकडून ‘सुदर्शन’ सर

मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या स्मिता कारीवडेकर यांनी बुधवारी (ता. ६) दुपारी एकच्या सुमारास सुदर्शनचा शिखरमाथा गाठत तेथे देशाचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा फडकविला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : माउंट मेरूच्या यशानंतर अवघ्या चारच दिवसांत ‘गिरिप्रेमी’च्या ‘पीक्यूब माऊंट सुदर्शन मोहिमे’च्या महिला संघाने गढवाल हिमालयातील माउंट सुदर्शन या सहा हजार ५२९ मीटर उंच शिखरावर यशस्वी चढाई केली. अशी कामगिरी करणारा हा देशातील पहिलाच संघ ठरला आहे.

मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या स्मिता कारीवडेकर यांनी बुधवारी (ता. ६) दुपारी एकच्या सुमारास सुदर्शनचा शिखरमाथा गाठत तेथे देशाचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा फडकविला. त्याचबरोबर मोहिमेच्या इतर सदस्या पूर्वा शिंदे- सिंग, पद्मजा धनवी, स्नेहा गुडे आणि स्नेहा तळवटकर यांनीदेखील सहा हजार २०० मीटरपर्यंत मजल मारली,

परंतु हवामान बिघडण्याची शक्यता लक्षात घेता सुरक्षेला प्राधान्य देत त्यांनी शिखरापासून केवळ काही अंतरावरून परतण्याचा निर्णय घेतला. संघातील आणखी एक सदस्य सीमा पै यांनी पाच हजार ५०० मीटरपर्यंत यशस्वी चढाई केली.

या संघाला मोहिमेच्या संयोजनामध्ये तसेच चढाईमध्ये ‘गिरिप्रेमी’चा गिर्यारोहक अखिल काटकर, ‘नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग’चे प्रशिक्षक लाले थाजिल पून, मुनींदर राणा, सौरभ कुमार, तसेच ग्यालबो शेर्पा यांनी मदत केली.

गढवाल हिमालयामध्ये वसलेले माउंट सुदर्शन शिखर हे अतिशय दुर्गम व चढाईसाठी कठीण असणारे शिखर आहे. सतत होणारे भूस्खलन, हिमस्खलन आणि वाटेत असणाऱ्या असंख्य हिमभेगा ही आव्हाने गिर्यारोहकांसमोर कायम असतात. या आव्हानांना तोंड देत, अरुंद कड्यांवरून चढाई करत गिर्यारोहकांना शिखराकडे जावे लागते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : जुगाराचे उलटे दान

Chh. Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात गणेश मंडळाच्या मंडप उभारणीच्या वादातून तुफान हाणामारी; तिघा भावांकडून हल्ला, एकाचा मृत्यू

आजचे राशिभविष्य - 23 ऑगस्ट 2025

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २३ ऑगस्ट २०२५ ते २९ ऑगस्ट २०२५ - मराठी राशी भविष्य

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 23 ऑगस्ट 2025

SCROLL FOR NEXT