पुणे

तलाव अन झाडांच्या पुनरुज्जीवनाचा अद्भुत उपक्रम 

नीला शर्मा

बेळगावमधील किरण निप्पाणीकर हे बुजलेल्या, सुकलेल्या तलावांतील गाळ काढून त्यात पुन्हा पाणी साठावं, यासाठी प्रयत्न करतात. रस्ता रुंदीकरणात काढाव्या लागणाऱ्या झाडांचं स्थलांतर तलावाकाठी किंवा देवळांपाशी मागणीनुसार करतात. मुळं सांभाळून काढलेली मोठमोठी झाडं दुसऱ्या जागी मातीत रुजवून नीट जगवली जातात. अशी शंभरहून अधिक झाडं त्यांनी स्थलांतरित केल्याची ही गोष्ट. 

कोणे एके काळी असलेल्या तलावाच्या फक्त आठवणीच का जागवायच्या? त्या तलावालाच पुनर्जन्म द्यायचा प्रयत्न का करू नये, अशा विचाराने झपाटलेल्या किरण निप्पाणीकर यांनी काम सुरू केलं. ते म्हणाले, ""इथल्या औद्योगिक क्षेत्रातील काही मंडळींनी यासाठी निधी दिला. जेसीबी, क्रेन यांसारखी यंत्र व मजुरांची एक टीम मी तयार केली. तलावाच्या पुनरुज्जीवनासाठीच्या या प्रकल्पात महत्त्वाचा भाग होता तो, काठावरील माती धरून राहावी, ती तलावात वाहून येऊ नये; यासाठी बंदोबस्ताचा. या हेतूने सभोवताली झाडं लावणं गरजेचं होतं. छोटी रोपं लावल्यावर ती वाढणार कधी, तोवर पावसाने माती धुपून तलावात येण्याची भीती होती. मग शहर विकास कामांतर्गत काही ठिकाणी तोडल्या जाणाऱ्या झाडांना स्थलांतर करून जगवण्याची कल्पना सुचली. रस्ता रुंदीकरणात काढाव्या लागणाऱ्या झाडांचं स्थलांतर तलावाकाठी केलं. ही मोठमोठी झाडं मुळासकट ट्रकमधून नव्या जागी आणली. रुजवली. अशी 90 टक्के झाडं जगवता आल्याने आत्मविश्वास वाढला. मग संपवली जाणारी आणखी झाडं काही देवळांच्या परिसरात किंवा मागणीनुसार काहींच्या जागेत लावू लागलो. आतापर्यंत शंभरहून अधिक झाडं अशा प्रकारे स्थलांतर करून, जोपासून त्यांना जीवनदान देता आलं.''   
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

निप्पाणीकर यांनी असंही सांगितलं की, एखाद्या ठिकाणी मोठाल्या झाडाच्या मुळांजवळच्या मातीचा ऱ्हास होतो. ते झाड उन्मळून पडतं. अशा झाडाभोवती आम्ही खोलवर खड्डा करून माती भरतो. त्याला पाण्याबरोबरच सेंद्रिय खत देऊन जगवतो. थोड्या दिवसांतच झाड पुन्हा जोम धरतं. बहरू लागतं. माझा रेस्टारंटचा व्यवसाय सांभाळून हे सारं करताना कमालीचं आत्मिक समाधान मिळतं. यात माझं रमणं पाहून इथली माणसं माझा उल्लेख "लेक मॅन' आणि "ट्री मॅन' अशा शब्दांत करू लागली आहेत, याची गंमत वाटते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT