Work stoppage movement for various demands of motorists in pune 
पुणे

पुण्यात वाहनचालकांचे विविध मागण्यांसाठी 'काम बंद' आंदोलन 

migrator

गोखलेनगर(पुणे) : कोरोना काळात सेवा बजावून पुणेकरांची काळजी घेणारे १००० कंत्राटी वाहन चालक यांनी आज सोमवार (ता.२१ डिसेंबर)पासून वेळेवर पगार मिळावा व स्थायी समिती व आयुक्त यांनी मान्यता दिलेले समान-काम,समान-वेतन लागू  करावे तसेच मागील महिन्याचा पगार त्वरित मिळावा या मागण्यांसाठी “काम बंद” आंदोलन पुकारले. माजी अध्यक्ष-विधी समिती दत्ता बहिरट व महाराष्ट्र कामगार मंचचे अध्यक्ष दिलीप मोहिते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पुकारण्यात आले.

मोटार वाहन विभाग प्रमुख यांना मुकुंदनगरला निवेदन दिल्यानंतर तिथून पुणे महापालिका पर्यत पायी मोर्चा काढण्यात आला. यात सर्व कंत्राटी चालक सामील झाले होते.याबाबत लेखी निवेदन आयुक्तांना देण्यात आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, टेंडर प्रक्रियेत अधिकारांचा गैरवापर करून मर्जीतल्या ठेकेदाराला काम मिळावे म्हणून आयुक्तांचे आदेश नसताना टेंडर क्र. ४७ विभाग प्रमुखांनी २८ ऑगस्ट २०२० ला रद्द केले व आयुक्तांची परवानगी ८ ऑक्टोबर २०२० ला घेतली या प्रकारामुळे चालकांचे वेतन वेळेत होत नव्हते त्यामुळे त्यांनी काम बंद आंदोलन सुरु केले. म्हणून बदली चालक म्हणून मोटार वाहन विभागप्रमुख यांनी पी.एम.पी.एम.एल चे बसचालक बोलावले व चालकाची कोणतीही चाचणी न घेता हायड्रोलिक प्रकारच्या बी.आर.सी वाहनावर बदली बसचालक पाठविला व त्यामुळे अपघात होऊन निष्पाप पुणेकर नागरिकाचा मृत्यू झाला असे निवेदनात म्हटले आहे.

निविदा प्रक्रियेतील घोळ, अधिकारांचा गैरवापर, चालकांना काम बंद आंदोलन करण्यास मजबूर करणारे अधिकारी व निष्पाप पुणेकर नागरिकाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी तसेच सर्व कंत्राटी कामगारांना समान काम- समान वेतन देण्याची तत्काळ अंमलबजावणी व्हावी  अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT