Chandrakant Patil sakal
पुणे

Chandrakant Patil : एकत्रित काम केल्यास पुणेकरांची कचऱ्याची समस्या सुटेल

कोरोनाच्या काळात सर्वांनी एकत्र येऊन त्यावर मात केली. त्याच पद्धतीने कचरा प्रश्‍नावर महापालिका, गणेश मंडळ आणि उद्योग क्षेत्र एकत्र आले तर ही समस्याही प्रश्‍न मार्गी लागेल.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या काळात सर्वांनी एकत्र येऊन त्यावर मात केली. त्याच पद्धतीने कचरा प्रश्‍नावर महापालिका, गणेश मंडळ आणि उद्योग क्षेत्र एकत्र आले तर ही समस्याही प्रश्‍न मार्गी लागेल. राज्य सरकारकडूनही यामध्ये मदत कमी पडू दिली जाणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोलॅब्रेटिव्ह रिस्पॉन्स (पीपीसीआर) आणि पुणे महापालिकेतर्फे ‘माझे पुणे, स्वच्छ पुणे’ ही मोहीम सुरू केली आहे. त्याचे उद्‍घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. आयुक्त विक्रम कुमार, पीपीसीआरचे संस्थापक डॉ. सुधीर मेहता, महापालिकेचे स्वच्छ अॅम्बॅसेडोर प्रसिद्ध संगीतकार सलिल कुलकर्णी, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त आशा राऊत, आशिष भंडारी, अखिल मंडई मंडळाचे अण्णा थोरात, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, भाजपचे प्रदेश प्रवक्ते कुणाल टिळक, राजीव खेर, मनोज पोचट, स्वच्छ अॅम्बॅसेडोर ऋतुजा भोसले आदी यावेळी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘पुण्याला मुबलक पाणी उपलब्ध व्हावेत यासाठी महापालिकेने शुद्ध केलेले सांडपाणी प्रक्रिया करून हे पाणी उद्योगांसाठी एमआयडीसीला दिले जाणार आहे. त्याबदल्यात त्यांचा पाण्याचा कोटा पुण्यासाठी दिला जाईल असा कायदाच केला जाणार आहे. समान पाणी पुरवठा योजनेतून गळती कमी होणार आहे. शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी राज्य सरकार मागे राहणार नाही.

विक्रम कुमार म्हणाले, ‘शहरात रोज २२०० टन कचरा निर्माण होतो. वारंवार कचरा पडतो असे शहरात सुमारे ५५० क्रॉनिक स्पॉट आहेत, त्यामध्ये शहराचा मध्यवर्ती व बाजारपेठेचा असलेला कसबा विश्रामबाग, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचाही काही भाग आहे. त्यामुळे दिवसातून तीन वेळा इथे स्वच्छता होणे आवश्‍यक आहे. या उपक्रमातून हा भाग स्वच्छ ठेवला जाईल. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शहराच्या इतर भागात अंमलबजावणी केली जाईल.

भंडारी म्हणाले, ‘शहरातील ९० टक्के कचरा संकलन आणि विलगीकरण व्हावे यासाठी पुढील वर्षभर प्रयत्न केले जाणार आहेत. पुण्याला स्वच्छतेमध्ये देशात पुढे आणणे व नागरिकांच्या आरोग्यात सुधार करण्यासाठी स्वच्छता आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS तुकाराम मुंढेंना मातृशोक, पुण्यात आईचं निधन; बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

Satara District Bank: राज्य सरकारकडून सातारा जिल्हा बँकेच्या भरतीला स्थगिती; भरती प्रक्रियेत गैरव्यवहार, कायदेशीर लढ्याला यश!

Latest Marathi News Live Update : दक्षिण रायगडमध्ये ढगाळ वातावरण; जोरदार वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा

Karad News: अतिक्रमणे हटवली; हॉकर्स झोन करा, कऱ्हाडला हातगाडाधारक आग्रही; किरकोळ विक्रेत्यांसाठी नियोजनबद्ध जागेची मागणी

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या उत्तरानंतर ग्रीनने घेतला बॉल हातात, KKR साठी गोलंदाजीला आजच उतरणार?

SCROLL FOR NEXT