wagholi11 
पुणे

परप्रांतीय मजुरांना लागलीये घरी जायची आस; पुण्यात त्यांची 'अशी' होतीये फरफट

नीलेश कांकरिया

वाघोली (पुणे) : प्रत्येकजण बसच्या प्रतीक्षेत, कोणी एकटा तर कोणी कुटुंबा समवेत. जिथे मिळेल तेथे त्या सावलीत हजारो परप्रांतीय मजूर बसून आहेत. कोणी रात्रीपासून तेथे बसले आहेत तर कोणी सकाळी तेथे पोहचले आहे. बस किती वाजता येतील, बस मिळेल का याचे नक्की उत्तर कोणाकडेच नाही. मिळेल त्या खाद्य पदार्थावर ते दिवस काढत आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, उत्तर प्रदेश येथील हे मजूर आहेत. त्यांना केवळ घरी जायची आस आहे. त्यामुळे सामाजिक अंतराचे ही त्यांना भान नाही. पुणे नगर महामार्गावरील खराडी येथील खासगी बस पॉइंटवरील हे चित्र आहे. 

या बस पॉइंटवरून महाराष्ट्राच्या बॉर्डर पर्यंत खासगी बसेस उपलब्ध आहेत. मात्र, त्याचे दर किमान 1200 पासून पुढे आहे. एका ठिकाणी जाण्यासाठी 22 जणांचा ग्रुप ही हवा. पुणे पोलिस आयुक्तालयाकडून या पॉईंट वरून मोफत एसटी बसेसची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यासाठी लागणाऱ्या पासेसची व्यवस्था येथे करण्यात येत आहेत. शहरातील विविध पोलिस ठाण्यात पास मिळालेले परप्रांतीय पीएमपीएलच्या साह्याने येथे आले आहेत. 

35 बसेस सोडण्याचे नियोजन शहर पोलिसांनी केले होते. मात्र, एसटीकडून तेवढ्या बसेस उपलब्ध होत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सकाळी 11 वाजता या बसेस निघतील असे सांगण्यात आले होते. मात्र, दुपारी एक नंतर एसटी बसेस येण्यास सुरुवात झाली. 4. 30 पर्यंत 12 बसेस तेथे दाखल झाल्या. 20 बसेस उपलब्ध होतील असे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

मजूर जागा मिळेल तेथे बसून होते. कोणी पाणी, कोणी बिस्कीट पुडा, कोणी मास्क, कोणी सरबत, कोणी फळे या ठिकाणी वाटप करीत होते. रांग लावून हे मजूर ते स्वीकारत होते. अंतर राज्यात जाण्यासाठीही अनेक नागरिक विचारणा करीत होते. मात्र त्यांना कोठेही समाधानकारक उत्तरे मिळत नव्हती. खासगी बसेसचे भरमसाट भाडे देणे शक्‍य नसल्याने अनेकांना जायचे कसे हा प्रश्न पडला होता. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

अनेक कुटुंबीयांत छोटे छोटे मुले होती. ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश होता. अनेकांनी कागदपत्रे जाण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र पास कधी मिळेल आणि बस कधी उपलब्ध होईल. हाच प्रत्येकाचा प्रश्न होता. सायंकाळी 5 वाजेपर्यंत या मोफत बसेस निघाल्या नव्हत्या. त्या बस मधून केवळ 450 मजूर राज्याच्या बॉर्डर पर्यंत जातील. अन्य मजुरांचा मुक्काम तेथेच असणार आहे. 

एसटीच्या "या' आहेत अडचणी 

  1.  चालकांची कमतरता 
  2. अनेक चालक अद्याप रुजू नाही 
  3.  अंतर जास्त असल्याने एका एसटी साठी दोन चालकांची गरज 
  4.  एसटी बसेस इतक्‍या दिवस बंद असल्याने त्यांच्या सर्व्हिसिंगची गरज. 

असे आहेत खासगी बसेसचे दर (प्रति प्रवासी ) 

मुक्ताई नगर - 1200 
जळगाव - 1200 
परभणी , लातूर - 1300 
नांदेड - 1500 
वर्धा, यवतमाळ, अमरावती - 1800 
अकोला - 1600 
नागपूर- 2000 
गोंदिया - 2200 

ट्रक टेम्पोकडे मजूर वळू लागलेत 
बसेस, रेल्वे उपलब्ध होत नसल्याने हे मजूर आता परराज्यात जाणारे ट्रक, टेम्पो शोधू लागले आहे. ट्रकवालेही 1000- 1200 भाडे सांगत आहेत. 
 

35 एसटी बसेसचे नियोजन केले होते. मात्र, एसटी बसेस उपलब्ध होत नाहीत. किमान 15 बसेस आज उपलब्ध होतील. त्यानुसार नियोजन करून त्यांना पाठविण्यात येईल. 
-पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त, परिमंडळ चार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : उद्या ठाकरेंचा विजयी मेळावा- वरळी डोममध्ये तयारी सुरु

ST Pass : एकाच महिन्यात 5 लाख विद्यार्थ्यांना शाळेत मिळाले एसटी पास; कोणाला मिळतो सवलतीचा पास? वाचा...

Indian Women Cricket Team: भारतीय महिला संघ आज रचणार इतिहास; T20 मालिका जिंकण्याची संधी

"निलेश तू कसा आहेस माहितीये..." साबळेंच्या व्हायरल व्हिडिओनंतर मराठी अभिनेता झाला व्यक्त ; म्हणाला..

SCROLL FOR NEXT