पुणे

कामांची मर्यादा ३० लाखापर्यंत करा

CD

SLC26B29746
फोटोओळ :
मुंबई : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना निवेदन देताना शंकर चौगुले, सरफराज काझी. यावेळी आमदार समाधान आवताडे.
---
लेबर फेडरेशनच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा
लेबर फेडरेशनची बांधकाम मंत्र्यांकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १७ : मजूर सहकारी संस्थांना देण्यात येणाऱ्या कामांची मर्यादा १० लाखांवरून ३० लाख रुपयांपर्यंत वाढवावी, तसेच संस्थांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनने केली आहे.
याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना देण्यात आले. मागण्यांवर शासन लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन मंत्री भोसले यांनी दिल्याचे फेडरेशनचे अध्यक्ष शंकर चौगुले यांनी सांगितले.
लेबर फेडरेशन व मजूर संस्थांच्या विविध मागण्यांसाठी फेडरेशनच्या शिष्टमंडळाने आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री भोसले यांची भेट घेतली. यावेळी माजी संचालक सरफराज काझी उपस्थित होते. मजूर सहकारी संस्थांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ठामपणे पाठपुरावा करण्यात आला आहे. संस्थांना भेडसावणाऱ्या अडचणी शासनदरबारी मांडून त्यांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण, रोजगाराच्या संधी आणि सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मजूर सहकारी संस्थांच्या हक्कांसाठी संघर्ष सुरूच राहणार असल्याचे चौगुले यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅफे फ्लाईंग जिप्सी प्रकरण! साताऱ्यात वाद, पुण्यात जीवघेणा हल्ला, प्रसिद्ध रिलस्टारसह सात जणांना अटक

सचिन आणि माझ्यात आधी मैत्री नव्हती... अशोक सराफ यांचा चकीत करणारा खुलासा; म्हणाले- मी त्याच्या वडिलांना...

इन्स्टाग्रामवर ओळखीनंतर भेटायला बोलावलं, बंद खोलीत नेत अल्पवयीन मुलांचं १४ वर्षीय मुलीसोबत घाणेरडं कृत्य; नालासोपाऱ्यात काय घडलं?

Marathi News Live Updates : आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्कांवर गदा आणणारा निर्णय मागे घेण्याची मागणी

अमित मालवीय यांना हटवलं, भाजपच्या IT सेलची कमान आता केमिस्ट्री प्राध्यापकाच्या हाती, कोण आहेत दीपक म्हस्के?

SCROLL FOR NEXT