worker died hit private organ over money theft allegations police arrested one criminal esakal
पुणे

Pune Crime News : गुप्तांगावर मारल्यामुळे कामगाराचा मृत्यू, संशयित ताब्यात

पैसे चोरल्याच्या आरोपावरून गुप्तांगावर लाथ मारल्यामुळे एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना जाधवनगर परिसरात घडली

सकाळ वृत्तसेवा

Pune News : पैसे चोरल्याच्या आरोपावरून गुप्तांगावर लाथ मारल्यामुळे एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना वडगाव येथील जाधवनगर परिसरात घडली. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

संदीप राजाराम पाटील (वय ५६, रा. महादेवनगर, वडगाव) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी प्रसद गोपाळ कारेकर (वय ३७, रा. जाधवनगर, वडगाव) या संशयिताला ताब्यात घेतले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी कारेकर याची टपरी असून, तो चोरून दारू विक्री करीत होता. त्याला यापूर्वी शहरातून तडीपार करण्यात आले होते.

संदीप त्याच्याकडे कचरावेचक म्हणून कामास होता. पैसे चोरल्याच्या आरोपावरून कारेकरने बुधवारी दुपारी संदीपला मारहाण केली. या मारहाणीत संदीपच्या गुप्तांगावर लाथ बसली. त्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास संदीप टपरीच्या जवळच पडला होता. दारू पिऊन पडल्याचे समजून त्याच्याकडे दुर्लक्ष केले.

परंतु नंतर त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलिस आयुक्त अप्पासाहेब शेवाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलिस निरीक्षक जयंत राजूरकर (गुन्हे) करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Love Marriage : लव्ह मॅरेजमुळे सासूनं छळलं, मुलगा होऊनही पतीची नाही साथ; शेवटी ५ महिन्याच्या बाळाला सोडून 'ती'ने सोडलं जग

Junior Hockey World Cup : आजपासून ज्युनियर हॉकी विश्वकरंडक; यजमान भारताला तिसऱ्या विजेतेपदाची संधी...

PMC Exam Postponed : १६९ जागांसाठीची पुणे महापालिकेची ऑनलाइन परीक्षा स्थगित; नव्या तारखेची लवकरच घोषणा

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! 'कांदा चाळीसाठी प्रतिटन चार हजारांचे अनुदान' ; राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीचा माेठा निर्णय..

Latest Marathi News Live Update : कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाच्या पावसाचा शक्यता; हवामान विभागाचा इशारा

SCROLL FOR NEXT