पुणे

पुणे : आम्हाला प्रतिदिन 600 रुपये वेतन द्या; कामगार संघटनेची मागणी

सकाळवृत्तसेवा

पुणे : लॉकडाउनमुळे आर्थिक संकटात अडवलेल्या कामगारांना रोजगार व निश्चित उत्पन्न मिळावे, आयकर उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या व कोरोनामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या कुटुंबाला सहा महिने 10 हजार आर्थिक सहाय्य द्यावे,     माणशी दरमहा 10 किलो धान्य मोफत देण्यात यावे आणि शहरात देखील किमान 200 दिवस रोजगार देणारी मनरेगा रोजगार हमी योजना सुरू करून तेथे प्रतिदिन 600 रुपये वेतन द्यावे, अशा काही मागण्यांसाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आज अप्पर कामगार आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.

भाजप सरकारची असंवेदनशीलता आणि चुकीच्या धोरणांमुळे कोरोना आपत्तीमध्ये कोट्यवधी असंघटित-असुरक्षित कामगार-कष्टकऱ्यांवर उपासमारीचे संकट आले आले, असा आरोप समितीने यावेळी केला. सरकारच्या या धोरणा विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत कामगारांना न्याय मिळवून देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. समितीचे अध्यक्ष कैलास कदम, श्रमिक एकता महासंघाचे दिलीप पवार, इंटकचे व्ही. व्ही. कदम, सिटूचे अजित अभ्यंकर, वसंत पवार, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ किशोर ढोकले, इंटकचे मनोहर गडेकर, अनिल रोहम, घर कामगार संघटनेच्या किरण मोघे आदी आंदोलनात सहभागी झाले होते. समितीच्यावतीने कामगार उपआयुक्त विकास पनवेलकर यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्थलांतरित कामगार, मजूर आणि हातावर पोट असलेल्या सर्वांचे कुटुंबीय सध्या अत्यंत वाईट परिस्थितीत जगत आहेत. त्यांना आता तरी सरकारने पुरेशी मदत करावी, अशी मागणी आंदोलनात सहभागी झालेल्या संघटनेच्या प्रमुखांनी केली.
कोरोनाची संधी साधून संघटित क्षेत्रातील कामगार कायदे मोडीत काढण्याची सुरुवात भाजपा शासित राज्यांनी केलेली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मालक-व्यवस्थापनांना खूश करण्यासाठी मोदी सरकार सर्वोच्च न्यायालयात स्वतःची परिपत्रकेच मागे घेते आहे. त्यामुळे संघटित क्षेत्रातील कामगारांच्या जगण्याच्या समस्या निर्माण होत आहेत. गेल्या काही दिवसांत पुणे परिसरात आर्थिक कोंडी झाल्याने मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत. ही बाब अत्यंत उद्वेगजनक आहे, असे अभ्यंकर यावेळी म्हणाले. औद्योगिक परिसरात कामगार कामाच्या वेळेनंतर तसेच जेवणाच्या सुट्टीमध्ये आंदोलन करीत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MHADA: म्हाडाची पुन्हा लाॅटरी निघणार! ‘पीएमजीपी’तून मिळणार ९०० घरे, पन्नास टक्के जागेवर उभारणार सदनिका

आखाती युद्धाचा पर्यटनाला फटका! महिन्याभरापासून विमानसेवा विस्कळीत, ट्रॅव्हल एजन्सीतील प्रवाशांचे बुकिंग रद्द

Solapur Mangalevedha news: ‘बसव ज्योत’ सायकल यात्रेचे मंगळवेढ्यात जल्लोषात स्वागत; महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकासाठी जनजागृतीला वेग

Pune Ambegaon gas crisis: आंबेगावच्या पूर्व भागात गॅस पुरवठा ठप्प; ६० हजारांहून अधिक ग्राहक त्रस्त, उत्तर प्रदेश-बिहारमधील कुटुंबे परतगावी

IPL 2026, SRH vs LSG: रिषभ पंतच्या अर्धशतकाने लखनौने विजयाचं खातं उघडलं; रोमांचक सामन्यात काव्या मारनच्या हैदराबादचा घरात पराभव

SCROLL FOR NEXT