पुणे

मजुरांना असाही मिळाला माणुसकीचा आधार

रमेश मोरे

जुनी सांगवी (पुणे) : हिंजवडी येथे लॉकडाऊन काळात बांधकाम साईट परिसरात अनेक बांधकाम मजूर पत्राशेड झोपडीवजा चाळीत तग धरून आहेत. गावगाड्यापासून काही अंतरावर अशा बांधकाम साईटवर ही मंडळी शहराच्या विविध भागात काम करतात.

एरव्ही ही मंडळी रविवारच्या आठवडी बाजारातून आठवड्यापुरते अन्नधान्य जीवनावश्यक गरजा पूर्ण करून आठवडाभर साईटवर असतात. आता संपूर्ण शहर सील करण्यात आल्याने जवळची जमापुंजी व जीवनावश्यक वस्तूंचा साठाही संपल्याने पुढे काय अशा विवंचनेत अडकलेल्या हिंजवडी येथील सत्तर बांधकाम मजूर बांधवांना जुनी सांगवीतील राजू सावळे व मित्र परिवाराकडून अन्नधान्य, टिकाऊ भाजीपाला पोचवण्यात आला.

हिंजवडीतील एका बांधकाम मजुराचा सामाजिक कार्यकर्ते राजु सावळे यांना "साहेब, राशन संपलय.जवळ एक दमडीही नाही.माझेच नाही तर इथल्या आमच्या सत्तर जणांच असंच आहे. असा फोन आला. राजू सावळे यांनी मोजक्या मित्र मंडळीला निरोप देवून काही तरी करतो म्हणून या मजूरांना सांगितले. शहराचे रस्ते सिल करण्यात आल्याने सांगवी पोलिसांकडे या मजुरांची हकीकत सांगून या मित्र परिवाराने दोन तासाच्या पोलिस परवानगीने या बांधकाम मजुरांना माणुसकीचा हात दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: मद्यपाशातून मुक्तीसाठी ५० रुग्णालयांत जनजागृती स्टॉल

टॉप थ्री वगळून ४ ते ६ नंबरच्या न्यायाधीशांची शिफारस; सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

आयआयटीत मृत्यूचे सावट! २० वर्षांत १७१ विद्यार्थ्यांची आत्महत्या, धक्कादायक वास्तव समोर

SCROLL FOR NEXT