Workers reached home already due to fear of lockdown 
पुणे

लॉकडाउनच्या भीतीने कामगारांनी आधीच गाठले घर

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुन्हा लॉकडाउन होणार या भीतीने गेल्या आठवड्यात अनेक कामगारांनी गावाकडील रस्ता धरला असल्याचे समोर आले आहे. परिणामी हॉटेल, बांधकामसह अनेक क्षेत्रात कामगारांची कमतरता भासू लागल्याने नवा प्रश्‍न उभा राहिला आहे.

पुणे व आजूबाजूच्या परिसरात परराज्यासह परगावातील काम करणाऱ्या मजुरांची मोठी संख्या आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाउन लागू करण्यात आला. त्या काळात अनेक मजूर अडकून पडले. त्यांना मूळ गावी जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामध्ये काही मजुरांचा मृत्यू देखील झाला. तर अनेक कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे प्रचंड हाल झाले. त्याचा परिणाम शहर व आजूबाजूच्या परिसरातील उद्योगांवर झाला होता. गेल्या काही महिन्यात त्यापैकी बहुतांश कामगार पुन्हा पुण्यात दाखल झाले होते.

इतके कनफ्युज मुख्यमंत्री बघितले नाहीत - मनसे

दरम्यान, कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुन्हा लॉकडाउन होणार अशी जोरदार अफवा गेल्या आठ ते दहा दिवसांपासून शहरात होती. पालकमंत्री अजित पवार यांनी देखील या संदर्भातील संकेत देऊन २ एप्रिल रोजी याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे पुन्हा लॉकडाउनची शक्यता गृहीत धरून शहरातील अनेक कामगारांनी आपली घरे आधीच गाठली. लॉकडाउन झाल्यास गेल्यावेळेस प्रमाणे हाल नको असे गृहीत गेल्या तीन ते चार दिवसात मूळगावाकडे जाणाऱ्या कामगारांची संख्या मोठी असल्याचे दिसून आले आहे. परंतु शुक्रवारी पालकमंत्री अजित पवार यांनी लॉकडाउनच्या ऐवजी निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेतला. मात्र, अनेक कामगारांनी आधीच घरचा रस्ता धरल्यामुळे अनेक व्यावसायिकांपुढे अडचणी उभा राहिल्या आहेत.

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी असा असेल मेगाब्लॉक

''आमच्या हॉटेलमध्ये उत्तर प्रदेश आणि बंगालमधील काही कामगार होते. पुन्हा लॉकडाउन होण्याची शक्यता गृहीत धरून दोन दिवसांपूर्वीच त्यांनी घर गाठले. त्यामुळे सध्या कामगारांची मोठी कमतरता भासत आहे.''
- राज गुप्ता, हॉटेल व्यावसायिक

''लॉकडाउन झाला तरी तुमची सर्व सोय करू असे आश्‍वासन देऊन देखील बांधकाम साइटवरील अनेक कामगार गेल्या आठवड्यातच घरी निघून गेले आहे. त्यामुळे सध्या असलेल्या कामगारांवरच काम सुरू आहे.''
- सुभाष गुरव, बांधकाम व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

80s Retro AI Trend Maharashtra : रे-बॅन गॉगल, जीन्स, यामाहा अन् १९८०चा लूक; शौमिका महाडिक, मुरलीधर मोहोळांसह नेत्यांचे रेट्रो फोटो व्हायरल

सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांना लेकीनं सुनावलं, नेटकऱ्यांनाही सडेतोड उत्तर देत म्हणाली...

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Marathi News Live Updates : सदाशिव पेठेत जुन्या वादातून एमपीएससी करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

SCROLL FOR NEXT