पुणे

Worker's Strick : वालचंदनगरमध्ये कामगारांचे थकीत वेतनासाठी आंदोलन !

सकाळ डिजिटल टीम

Worker's Strick : वालचंदनगर (ता.इंदापूर) येथे वालचंदनगर कंपनीतील ५०० पेक्षा अधिक कामगारांनी सुमारे ७.५ कोटी रुपयांच्या थकीत वेतनासाठी वालचंदनगर मध्ये एक दिवसाचे लाक्षणिक उपोषणास सुरवात केली.

वालचंदनगर मधील वालचंदनगर कंपनीतील कामगारांनी आज मंगळवार (ता.१५) रोजी जुन्या वालचंदनगर बसस्थानकार वर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. उपोषणामध्ये कंपनीतील ५०० पेक्षा अधिक कामगारांनी सहभाग घेतला. यासंदर्भात आयएमडी कामगार समन्वय संघाचे अध्यक्ष कपिल गायकवाड व सचिव शहाजी दबडे यांनी सांगितले की, वालचंदनगर कंपनीने फेब्रुवारी,मार्च,एप्रिल या तीन महिन्याचा कामगारांचा पगार दिला नाही.

तसेच एप्रिल २०२१ ते जुन २०२३ या काळामध्ये कामगारांनी केलेल्या जादा कामाचे (ओव्हरटाईमचे) ही वेतन दिले नाही. जानेवारी २०२० ते जून २०२३ या काळातील मेडिकल स्क्रीम अंतर्गतचे पेमेंट दिले नाहीत. २०२३ मधील तीन महिन्याचे इन्सेंटिव्ह पेमेंट ही थकित असून तीन वर्षाचा एलटीए पेमेंट तसेच दोन वर्षापासून कामगारांना गणवेश मिळाला नाही. कामगारांचे पगार व इतर देणी थकीत असल्याने कामगारांच्या कुंटूबासमोर आर्थिक अडचणी उभा राहिल्या आहेत.कामगारांची उपासमार होत आहे.

कामगारांच्या थकीत पैशासंदर्भात वेळोवळी कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा केली. मात्र व्यवस्थापन दाद देत नसल्यामुळे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.उपोषणामध्ये भारतीय मजदूर संघाच्या मशनरी मॅन्युफॅक्चरींग वर्क्स युनियनच्या सदस्यांनी सहभाग घेतला असून सर्व कामगार एकजुटीने आंदोलनामध्ये सहभागी झाले असल्याचे मशनरी मॅन्युफॅक्चरींग वर्क्स युनियनचे अध्यक्ष राहुल बावडेकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Airport Emergency : कोल्हापूर विमानतळावर ‘इमर्जन्सी लँडिंग’, काय होती मेडिकल इमर्जन्सी; पुढे काय झाल?

Crime News : गोव्यात उपचाराच्या नावाखाली परदेशी तरुणीवर अत्याचार, २८ वर्षीय डॉक्टरला सोलापुरातून अटक, ICU मध्ये असताना त्याने...

PCMC Budget 2026 : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग; २,७००हून अधिक अभिप्राय नोंदले

TET Exam Supreme Court : टीईटी परीक्षेबाबतचा ‘सर्वोच्च’ निकाल बहुचर्चित, शिक्षक वर्गात धास्ती शासनाकडे पुनर्विचार याचिकेची मागणी

3D Image Creation: तुम्हालाही बनवता येतील एक नव्हे तर अनेक पोझमध्ये भन्नाट नॅनो बनाना 3D फोटो, फक्त वापरा 'हे' प्रॉम्प्ट्स

SCROLL FOR NEXT