पुणे

नवीन शैक्षणिक पद्धतीबाबत शारदानगरला कार्यशाळा

CD

माळेगाव, ता. १० : बारामती तालुक्यात १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी शारदानगरमध्ये नवे शैक्षणिक धोरण २०२० स्कूल कनेक्ट अभियानानिमित्त कार्यशाळेचे आयोजन केले आहे. गुरुवारी (ता. १३) शारदाबाई पवार महिला कॉलेज शारदानगर येथे सकाळी १० वाजता ही कार्यशाळा घेण्यात येईल. नव्याने आलेली शैक्षणिक पद्धत आणि त्यामध्ये झालेले बदल, बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम, मल्टिपल एन्ट्री मल्टिपल एक्झिट, एकसमान श्रेयांक-क्रेडिट पद्धत, 3+1 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम, पाच वर्षांचा एकात्मिक बहुविद्याशाखीय पदव्युत्तर अभ्यासक्रम (मास्टर्स), वर्गातील प्रवेश कसे घ्यावेत, कोणती विद्याशाखा निवडावी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना कसे फायदेशीर ठरणार आहे आदी विषयांच्या अनुषंगाने कार्यशाळेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कार्यशाळेत सहभागी होणारे पालक आणि विद्यार्थ्यांना नोंदणी शुल्क नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्राचार्य आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. देविदास वायदंडे आदी शिक्षण तज्ञ उपस्थितांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती डॉ. श्रीकुमार महामुनी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

६ महिन्यांच्या चिमुकल्यावर कुत्र्याचा हल्ला, पिटबुल नव्हे तर American Bully; मालक म्हणाला, उपचारावर ४ लाख खर्च केले

Ajit Agarkar Salary : अजित आगरकरने BCCI कडून किती पगार घेतला? त्याच्या कार्यकाळात भारताची कामगिरी कशी झाली? Report Card

Shah Rukh Khan FDA Notice : तुकाराम मुंढे शाहरुख खानवर कारवाई करणार? FDA च्या नोटीसीला उत्तर न दिल्याने पुढील प्रक्रिया सुरू

6:30 वाजता WFH करण्यास सांगितलं, 9:30 वाजता Google Meetची लिंक आली अन् अवघ्या 5 मिनिटांत 80 जणांची नोकरी गेली; नक्की काय घडलं?

अकरावीत आईला म्हणाल्या मला रुचीरशीच लग्न करायचंय! मृणाल कुलकर्णी यांनी प्रेमासाठी केलेली बंडखोरी, अशी खुललेली लव्हस्टोरी

SCROLL FOR NEXT