Blood-Bank sakal
पुणे

World Blood Donor Day : पहिल्या सहकारी रक्तपेढीची प्रतीक्षा

सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेले राज्य म्हणून ख्याती असलेल्या महाराष्ट्राला पहिल्या सहकारी रक्तपेढीची प्रतीक्षा आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेले राज्य म्हणून ख्याती असलेल्या महाराष्ट्राला पहिल्या सहकारी रक्तपेढीची प्रतीक्षा आहे. आधुनिक काळातील बदलत्या गरजा लक्षात घेऊन खासगी आणि धर्मदाय न्यासांतर्गत नोंदणी झालेल्या रक्तपेढ्यांबरोबरच सहकारी रक्तपेढी ही काळाची गरज असल्याची मागणी पुढे येत आहे.

जागतिक रक्तदाता दिन उद्या (ता. १४) साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या रक्तहितवर्धिनी सामाजिक संस्थेतर्फे ही मागणी करण्यात आली.

कृत्रिम पद्धतीने रक्त तयार करण्याचे असंख्य प्रयोग जगभरात सुरू असले तरीही त्याला अद्याप पुरेसे यश मिळाले नाही. त्यामुळे दान केलेल्या रक्तातूनच दुसऱ्या व्यक्तीचे प्राण वाचविणे शक्य होत आहे. यासाठी रक्तपेढ्यांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे अधोरेखित झाले आहे. मात्र, राज्यात सध्या खासगी आणि धर्मादाय न्यासांतर्गत रक्तपेढ्या आहेत.

मात्र, रक्तदात्यांनीच सुरू केलेल्या सहकारी तत्त्वावरील पहिल्या रक्तपेढीची गरज आता निर्माण झाली आहे. पुण्यात या प्रकारची रक्तपेढी सुरू करण्यासाठी सरकारी पातळीवर पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती मिळाली.

संस्थेचे चंद्रशेखर शिंदे म्हणाले, ‘अनेक संयोजक रक्तदात्यांचे मोठे जाळे आहे. त्यामुळे रक्तदात्यांची रक्तपेढी सुरू झाल्याने सातत्याने रक्ताचा जाणवणारा तुटवडा कमी होईल. सहकाराच्या नियमानुसार रक्तदाता हाच भागधारक आणि सभासद होईल. त्यामुळे रक्तपेढीचे कार्य करणे सुलभ होईल. त्यामुळे सहकारी रक्तपेढी हा एक अभिनव उपक्रम आहे. त्याला आता सरकारी पाठिंब्याची गरज आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro Pillar Collapse: मुलुंड दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट! 'मिलन रोड बिल्ड्टेक' कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

IND vs AUS: विश्वविजेत्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला होणार सुरुवात; पाहा संपूर्ण वेळापत्रक अन् Live Telecast डिटेल्स

Solid Waste Rules: घन कचरा व्यवस्थापन नियम बदलणार! ओला आणि सुका कचरा आता वेगवेगळ्या दिवशी घेणार; सुचनांचे उल्लंघन केल्यास दंड

Marathi Cinema : शरद गोरे यांच्या एक प्रेरणादायी प्रवास सूर्या मराठी चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगभर डंका

T20 WC, IND vs PAK: '२४ तास थांबा, त्यानंतर...', सूर्यकुमार यादव पाकिस्तानसोबत हँडशेक करण्याबाबत काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT