World Environment Day Public awareness to avoid use of plastic bottles Panchamahabhute Foundation sakal
पुणे

World Environment Day : प्लॅस्टिक बाटल्‍यांचा वापर टाळण्यासाठी जनजागृती

‘पंचमहाभूते फाउंडेशन’तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने पंचमहाभूते फाउंडेशनतर्फे ‘प्लॅस्टिक बाटल्यांचा वापर टाळा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम’ (यूएनएपी) संस्थेतर्फे ‘बीट प्‍लॅस्टिक पोल्यूशन ही संकल्पना राबविण्यात येत असून त्‍याच धर्तीवर फाउंडेशनतर्फे देश पातळीवर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.

जागतिक पर्यावरण दिनाच्‍या यंदाच्या सोहळ्यामध्ये यूएनएपीने पंचमहाभूते फाउंडेशनला अधिकृतरीत्या सामील केलेले आहे. ‘सोल्यूशन्स फॉर पोल्यूशन’ हे ब्रीदवाक्य घेऊन जगभरातील पर्यावरणप्रेमी व्यक्ती आणि संस्थांना या कार्यात सहभागी करण्यासाठी फाउंडेशन प्रयत्नशील आहे. विशेष म्हणजे या कार्याची जगभरातून दखल घेण्यात येत आहे.

दरम्यान ‘जागतिक पर्यावरण दिन २०२३’ समितीने या वर्षीच्या पर्यावरण दिन उपक्रमांमध्ये फाउंडेशनच्या ‘प्लॅस्टिक बाटल्यांचा वापर टाळा’ उपक्रमाचा समावेश केला आहे. यासोबतच ‘कॉप २८’ च्या उच्चस्तरीय समितीकडून फाउंडेशनच्‍या उपक्रम व कार्याला पाठिंबा लाभलेला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मान्यवरांनीदेखील या मोहिमेत सहभाग घेतला आहे. दरम्यान जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभाग घ्यावा म्हणून उपक्रमाची व्याप्ती वाढविण्याचा फाउंडेशनचा उद्देश आहे.

फाउंडेशनचे अमित सावंत याबाबत म्हणाले, ‘‘प्लॅस्टिक बाटल्या वापरल्यामुळे शरीराची होणारी हानी आणि या बाटल्यांच्या विघटनासाठी लागणारा ४५० वर्षांचा कालावधी, या मुद्द्यांसंदर्भात लोकांमध्ये मोहिमेच्या माध्यमातून जागृती केली जात आहे.

प्लास्टिक बाटल्यांचे पर्याय म्हणून मातीची, लाकडाची, स्टेनलेस स्टीलची, तांब्याची किंवा काचेची बाटली वापरा आणि पर्यावरण संरक्षणासाठी आपले योगदान द्या, असे आवाहन फाउंडेशनद्वारे केले जात आहे. यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होईलच, पण त्याचबरोबर पर्यावरणपूरक बाटल्यांचे उत्पादन करणाऱ्‍या लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रालाही प्रोत्साहन लाभेल.’’

फाउंडेशनद्वारे राबविले जाणारे उपक्रम

फाउंडेशनच्या वतीने वृक्ष लागवड, मिनी फॉरेस्ट, नेल फ्री ट्री, पावसाच्या पाण्याची साठवण (रेनवॉटर हार्वेस्टिंग) तसेच प्लॅस्टिक संकलन मोहीम, बीच क्लीनअप, सीड कलेक्शन ड्राईव्ह, नो बाथ डे, टू मिनिट शॉवर, गिफ्ट अ ट्री या सारख्या अभिनव कल्पना राबविण्यात येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: शिवसेनेच्या सुरू असलेल्या खटल्यात न्याय कधी मिळणार? उद्धव ठाकरेंनी थेट 'ती' वेळच सांगितली! म्हणाले...

India Squad for Australia : रोहित शर्मा, विराट कोहलीच्या ODI भविष्याबाबत संकेत मिळाले, पण दोन खेळाडूंचं करियर संपल्यातच जमा झाले! संघात त्यांचे नावच नाही

Nilesh Ghaiwal: 'घ'च्या ऐवजी 'ग', घायवळने पासपोर्ट मिळवण्यासाठी कसा घातला घोळ? सापडला मोठा पुरावा, १0 दिवसांपूर्वी उघडले बँक खाते

Latest Marathi News Live Update : जयंत पाटलांवरील टीकेनंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर नरमले; वादावर पडदा

Lasalgaon News : बसस्थानकात विद्यार्थिनींचा आक्रोश! 'आम्ही सुरक्षित आहोत का?'; लासलगाव बस डेपोच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT