World-Health-Organization 
पुणे

कोरोनाकाळात द्या आहाराकडे लक्ष!; जागतिक आरोग्य संघटनेचे आवाहन

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनाकाळात पौष्टिक आहाराच्या कमतरतेमुळे मानसिक आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे निरोगी आयुष्यासाठी आहारात पौष्टिक घटक आणि आवश्‍यक जीवनसत्त्वांचा समावेश करणं गरजेचं आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मानसिक आरोग्यासाठी अशी घ्या काळजी...
 मानसिक अनारोग्य म्हणजे काय?
मनाची मनोवृत्ती, चिंतेची पातळी, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि मेंदूच्या कार्यक्षमतेवर झालेले दुष्परिणाम म्हणजे मानसिक अनारोग्य. यामुळे अस्थिर मनःस्थिती, नैराश्‍य, चिंता, झोप न लागणे, चिडचिडेपणा, अस्वस्थता जाणवते. याचा परिणाम रोजच्या जगण्यावरही होतो.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

    आहाराचा मानसिकतेशी संबंध कसा?
अपोलो डायग्नोस्टिक्‍सच्या सर्वेक्षणानुसार, कोरोनाकाळात बहुतांश तरुणांमध्ये मानसिक आजाराची समस्या समोर आली. पौष्टिक आहाराचा अभाव हे यामागील मुख्य कारण असल्याचे डॉक्‍टर सांगतात. चांगला, सकस व समतोल आहार घेतला तर बरेचसे आजार टाळता येतात. त्यामुळे आपल्या मनाची मनोवृत्ती स्थिर राहते. 

    संतुलित आहार कसा असावा?
व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन डी, कॅल्शिअम आणि लोह यांचा आहारात समावेश आवश्‍यक. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार रोजच्या आहारात एक फळ, पालेभाज्या, डाळी, मांसाहार, अंडी यांचा समावेश असावा. रोज दोन लिटर पाणी प्यावे. 

    वेळीच घ्या डॉक्‍टरांचा सल्ला !
कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांनी संतुलित आहार आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अस्वस्थ वाटत असेल, चिडचिड होत असेल तर डॉक्‍टरांचा सल्ला घ्या. संगणकावर सातत्याने काम, बाहेर न पडणे, अनावश्‍यक भीती यामुळे मानसिक समस्या जाणवू शकते. त्याकडे विशेष लक्ष द्या.

    अंधश्रद्धा पाळू नका !
भारतीय मनोरुग्ण संस्थेच्या सर्वेक्षणानुसार देशात अजूनही मानसिक समस्येकडे निषिद्ध (टॅबू) म्हणून पाहिले जाते. मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यम वर्गियांमध्ये मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेण्याविषयी अंधश्रद्धा आहे. लॉकडाउनच्या काळात ८५ टक्के लोकांमध्ये थकव्याची समस्या, तर ४० टक्के लोकांना सर्वसाधारण मानसिक समस्या जाणवल्याचे या सर्वेक्षणातून पुढे आले आहे.  

- यांची कमतरता करते आरोग्यावर परिणाम 
१) झिंक - मूड आणि चिंतेच्या पातळीवर परिणाम. भूक कमी आणि व्यक्तीला अशक्तपणा.

२) ओमेगा- फॅटी ॲसिड - अस्थिर मनःस्थिती, नैराश्‍य, चिंता वाढते.

३) व्हिटॅमिन डी - नैराश्‍य, चिंता आणि मानसिक आरोग्यावर परिणाम.

४) व्हिटॅमिन बी १२ - नैराश्‍यावर मात करता येऊ शकते.

६) मॅग्नेशिअम - चिंता आणि भीती, अस्वस्थता, झोप न लागणे आणि चिडचिडेपणा.

७) सेलेनियम - मूड सुधारण्यास मदत.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आरोग्य तपासणीत २५ ते ५५ वयोगटातील व्यक्तींचे नमुने घेण्यात आले होते. त्यातून असे निदर्शनास आले की, गेल्या १२ महिन्यांत जवळपास २० टक्के लोकांना पोषण कमतरता आहे. यामागील मानसिक आरोग्य हे मुख्य कारण आहे.
- डॉ. संजय इंगळे,  रोगनिदान तज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT