पुणे

World No Tobacco Day : लवकर निदान हाच कॅन्सरमुक्तीचा मार्ग

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ''तुम्ही तंबाखू खाता, गुटखा चघळता किंवा सिगारेटचे झुरके ओढता का? या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ असेल आणि त्याचवेळी तुमच्या तोंडात कोणतीही बरी न होणारी जखम असेल तर तुम्हाला कर्करोगाचा धोका असू शकतो. कर्करोगाचे लवकर निदान केल्यास तो बरा होण्याची शक्यता वाढते.''

खैनी असो की, गुटखा किंबहुना त्यापुढे जाऊन केलेले धूम्रपान या देशातील तंबाखू वापरण्याच्या वेगवेगळ्या पद्धती. पण, यात सर्वांत मोठा धोका असतो तो कर्करोगाचा. यामध्ये तोंडातील कोणतीही जखम कर्करोगाची सुरवात असू शकते. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका. दरवर्षी ३१ मे हा तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने तंबाखूमुळे होणाऱ्या तोंडाच्या कर्करोगाचे लवकर निदान करणे ही आता काळाची गरज आहे. तंबाखूच्या दुष्परिणामांबद्दल जनजागृती करण्याची मोहीम दंतवैद्यकीय शास्त्राच्या विद्यार्थ्यांनी हाती घेतली आहे.

याबद्दल माहिती देताना, भारती विद्यापीठ दंतवैद्यकीय महाविद्यालयाच्या तृतीय वर्षाची विद्यार्थिनी ध्रिती गार्डे म्हणाली की, निकोटीन हा घटक तंबाखूमध्ये असतो. त्यामुळे तंबाखू किंवा सिगारेटचे व्यसन जडते. त्यातून तोंडाचा तसेच फुफ्फुसाचीही कर्करोग होण्याचा धोका असतो. देशात प्रत्येक तासाला पाच रुग्णांचा मृत्यू फक्त तोंडाच्या कर्करोगामुळे होतो. देशातील तिसऱ्या क्रमांकाचा हा घातक ठरलेला कर्करोग आहे, यातूनच त्याचे गांभीर्य स्पष्ट होते. कर्करोगाची सुरवात ही अत्यंत लहान लक्षणापासून होते. त्यामुळे वेळीच निदान आणि प्रभावी उपचार हा यातील महत्त्वाचा भाग असतो. कर्करोगाचे उपचार दीर्घकालीन, अवघड आणि खर्चिक असतात. त्यासाठी काही रुग्णांवर शस्त्रक्रिया करावी लागते. तसेच, त्यांना केमोथेरपी आणि रेडिएशन द्यावे लागते. हा कर्करोग शरीराच्या इतर भागात पसरणार नाही, याची खबरदारी घेऊन त्यावर आक्रमक उपचार पद्धतीचा वापर करावा लागतो. ही सगळी गुंतागुंत टाळण्यासाठी तंबाखू खाणाऱ्यांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे.

तोंडाच्या कर्करोगाची ठळक लक्षणे

  • तोंडातील बरी न होणारी जखम

  • तोंडात एखाद्या ठिकाणी आलेली गाठ

  • ओठ, हिरड्यांना आलेली सूज

  • तोंडातून येणारे रक्त

  • तोंडात दिसणारे लाल-पांढरे चट्टे

  • अचानक वजन कमी होणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात मोठी उलथापालथ! इतकी वर्ष संघासोबत असलेल्या भरवशाच्या खेळाडूने साथ सोडली, MS Dhoni...

Trending : आता रात्री होणार नाही अंधार! अंतराळात लागणार ६० फुटांचा आरसा; अमेरिकेच्या प्लॅनने वैज्ञानिक चक्रावले, नेमका विषय काय?

Newly Married Woman : 2 दिवसांनी होतं मुलीचं बारसं, घरात चालू होती तयारी; पण त्याआधीच 23 वर्षांच्या 'या' उच्चशिक्षित माऊलीनं...

Latest Marathi News Live Update : तामिळनाडूमध्ये गोवंश हत्याबंदी लागू करण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्देशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

Pune Airport: पुणे विमानतळाचे जुने टर्मिनल ‘बिकास’च्या प्रतीक्षेत; दीड वर्षापासून बंद, पुनर्विकासासाठी २४ कोटी रुपयांचा खर्च

SCROLL FOR NEXT