पुणे

मोबाईलच्या जगातून बाहेर पडून पत्रलेखनाची गोडी जोपासा!

CD

SLC26B30199
सोलापूर : जागतिक टपाल दिनानिमित्त महापालिका शाळेत आयोजित ‘धरती मातेस पत्र’ स्पर्धेत सहभागी विद्यार्थी आणि उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर.

धरती मातेला पत्र लिहा, निसर्गाशी नाते जोडा!
जागतिक टपाल दिनानिमित्त महापालिका शाळेत उपक्रम; पत्रलेखनातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १० : मोबाइलच्या वापरातून काही काळ बाहेर पडून विद्यार्थ्यांनी पत्रलेखन, वाचन आणि निसर्गप्रेमाची जोपासना करावी, असे आवाहन उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी केले. जागतिक टपाल दिनानिमित्त महापालिकेच्या शाळेत टपाल विभागाच्या सहकार्याने ‘धरती मातेस पत्र’ हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये पत्रलेखनाची आवड निर्माण करणे आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव रुजविणे हा त्यामागील उद्देश होता.
या उपक्रमांतर्गत आयोजित स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पृथ्वीमातेविषयीच्या भावना पत्रातून व्यक्त केल्या. वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन, पर्यावरणाचे रक्षण आणि निसर्गाप्रति जबाबदारी अशा विषयांवर त्यांनी विचार मांडले. यावेळी टपाल विभागाच्या पोस्टमास्तर व अधिकारी कुलकर्णी, अमोल निंबाळकर यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वरकुमार सुतार, नारायणकर व शिक्षकवर्गाने विद्यार्थ्यांना पत्राची रचना, विचारांची मांडणी व पृथ्वीमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी पोलिसांच्या ताब्यात; सहाशेपेक्षा जास्त आंदोलकांना पोलिसांनी उचललं, आकाशवाणीजवळ दगडफेक

Home Loan EMI: होम लोन घेणाऱ्यांना झटका! 4 बँकांनी वाढवले व्याजदर; EMI किती वाढणार?

MPSC Exam : ‘गट ब’ मुख्य परीक्षा सरसकट रद्द करू नका; उत्तीर्ण उमेदवारांची मागणी

Marathi News Live Updates : ‘देशात लोकशाहीऐवजी हुकूमशाही’; प्रियांका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

IND vs WI 3rd T20: भारत-वेस्ट इंडिजचा तिसरा टी-२० सामना कुठे अन् कधी पाहता येणार? LIVE Streaming, वेळ अन् TV चॅनेलची माहिती जाणून घ्या

SCROLL FOR NEXT