enver.jpg 
पुणे

सोशल मिडीयावर 'आपलं घरं, आपली वसुंधरा' चा ट्रेंड 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : कोरोना विषाणू सगळीकडे थैमान घालत असताना, यंदाचा जागतिक वसुंधरा दिवस नागरिकांनी घरात राहूनच साजरा केला.

अनेकांनी स्वत:चे संरक्षण करत वसुंधरेच्या सुरक्षिततेची आणि संवर्धनाची शपथ घेतली. ""आपलं घरं, आपली वसुंधरा'' या शीर्षकाखाली सोशल मिडीयावर ट्रेंड सुरू आहे. या ट्रेंडच्या माध्यमातून निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला जात आहे. 

एरव्ही दरवर्षी जागतिक वसुंधरा दिन (ता.22) पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक कार्यक्रमांनी साजरा केला जातो. शहरात ठिकठिकाणी प्रदर्शन, स्वच्छता मोहीम हाती घेतली जाते. मात्र, यंदा लोक एकमेकांपासून दूर, आपापल्या घरात आहेत. त्याचवेळी वसंत ऋतू बाहेर फुलला आहे. निसर्ग कात टाकतो आहे. पण हीच ती वेळ आहे, जेव्हा एकत्र न येताही आपण एकत्र असल्याची जाणीव एकमेकांना करून देऊ शकतो. पृथ्वीविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करू शकतो आणि ती अशीच सुंदर राहावी यासाठी आपण काय करायचा आहे, असा संदेश नेटिजन्स एकमेकांना देत आहेत.

अनेकांनी सोशल मिडीयावर 'हॅप्पी अर्थ डे,' 'झाडे लावा, झाडे जगवा', 'वसुंधरा मातेला शत्‌ शत्‌ नमन', 'निसर्ग वाचवा, निसर्गाचे सौंदर्य जपा,' 'वृक्षांचे करा संवर्धन, धरती होईल नंदनवन,' 'क्षणाक्षणाला बदलतो, निसर्ग रोज नवा नवा, निसर्ग वाटतो हवा हवा' असे नानाविध संदेश 'आपलं घरं, आपली वसुंधरा' या शीर्षकाखाली वाचण्यास मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paithan-Sambhajinagar Highway Crash: पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात; अर्धवट रस्त्याच्या कामामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू

आदिवासी विद्यार्थ्यांचं पुण्यातील आंदोलन स्थगित! 'वर्षा' बंगल्यावर आंदोलन करण्याचा उपोषणकर्त्यांचा इशारा

Rahul Gandhi: ''काँग्रेसचा इतिहासच दलितविरोधी'', राहुल गांधींच्या आरोपांनंतर भाजपचा जोरदार पलटवार

ISRO GSLV F-17 launch: आठ महिन्यांनंतर इस्रोची उड्डाणशृंखला पुन्हा सुरू; जीएसएलव्ही एफ-१७ वरून भूस्थिर कक्षेत ईओएस-०५ दूरसंवेदन उपग्रहाचे ४ सप्टेंबरला प्रक्षेपण

Nepal Flood Miracle Rescue: नेपाळच्या महापुरातून ९७ वर्षीय गुणा माया बोहरांची चमत्कारिक सुटका; ढिगाऱ्यांतून फुललेली जगण्याची उमेद

SCROLL FOR NEXT