World Women Day sakal
पुणे

जागतिक महिला दिन; महिलांनी स्पष्ट केला स्वातंत्र्याचा अर्थ

महिलांना सामाजिक स्वातंत्र्य मिळाले तरच देश प्रगतिपथावर

सकाळ वृत्तसेवा

पुणे : स्वातंत्र्यानंतर देशाने प्रत्येक क्षेत्रात झेप घेतली. मोठा बदल घडत गेला तो म्हणजे स्त्रियांच्या आयुष्यात. स्त्रियांच्या प्रगतीसाठी, सुरक्षेसाठी नवीन कायदे केले जात आहेत. महिलांना सामाजिक, वैयक्तिक स्वातंत्र्य मिळाले तरच देश प्रगती करू शकेल. त्यांच्या वैयक्तिक जीवनात विकास होऊ शकेल, असे मत महिलांनी व्यक्त केले आहे. प्रत्येक महिलेसाठी स्वातंत्र्याचा अर्थ वेगळा असतो. आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येत आहे. महिलादिनानिमित्त विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी त्यांच्या मते स्वातंत्र्याचा अर्थ काय आहे हे स्पष्ट केले.(World Women Day)

‘‘ मी याआधी घरीच शिलाई काम करायचे. परंतु, त्यात मला परवडत नव्हतं. माझे तीन मुलं शिक्षण घेत आहेत. पतीच्या वेतनामध्ये घर खर्च, मुलांचे शिक्षण इतर खर्च भागविणे कठीण झाले होते. मी बाहेर पडून काहीतरी काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याला माझ्या पतीने मला प्रोत्साहन दिले. मला सोसायटीमध्ये सफाई कर्मचारी म्हणून नोकरी मिळाली. आता घरात मी पण काम करून कमावीत असल्यामुळे आर्थिक आधार मिळाला आहे. महिलेने स्वतःच्या पायावर उभं राहणं, काहीतरी ती तिच्या इच्छेनुसार करणं म्हणजे तिचा खरं स्वातंत्र्य आहे.’’

-मुबिना शेख - सफाई कर्मचारी

‘‘महिलांना त्यांच्या आयुष्यातील निर्णय घेऊ दिले पाहिजेत, नवीन गोष्टी करण्याचे प्रोत्साहन तिला दिले पाहिजे, तिला स्वतः काही करण्याची संधी मिळाली तरच महिला वैयक्तिक आणि सामाजिक क्षेत्रात प्रगती करू शकेल. गेल्या २० वर्षांपासून मी फुटवेअर्सचा व्यवसाय करीत आहे. माझ्या घरच्यांनी मला प्रेरित केलं, आधार दिला, संधी दिली, त्यामुळे मी या क्षेत्रात चांगल्या पद्धतीने काम करत आहे. अशी सक्षम होण्यासाठी संधी, प्रोत्साहन, आधार प्रत्येक महिलेला मिळणे म्हणजे स्वातंत्र्य आहे.’’

-रूपाली काळे - व्यावसायिक

‘‘माझ्या आईवडिलांनी मला कधीच कोणत्या गोष्टी करण्यास नाकारले नाही. मला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले. लग्नानंतर माझ्या पतीनेही मला नेहमी सपोर्ट केला. महिला असो किंवा पुरुष सर्वांना समान अधिकार, हक्क, जबाबदारी आहे. महिलांनी स्वप्न बघितली पाहिजे, स्वतःसाठी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. महिलांना एवढेच सांगेल की तुमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कोणीतरी येईल, अशी अपेक्षा ठेऊ नका. महिलांना घरातील सदस्यांनी प्रेरित केले तर नक्कीच ती पुढे जाईल. हेच तिचं खरं स्वतंत्र असेल’’

-प्रिया झेंडे - व्यावसायिक

‘‘कोणतेही बंधन नसणं, दडपण नसणं, स्वतःच्या मनाप्रमाणे जगणे म्हणजे स्वतंत्र आहे, असे मला वाटते. प्रत्येक स्त्रीला हे स्वातंत्र्य मिळालं तर नक्कीच ती कोणत्याही क्षेत्रात, कोणत्याही कामात नाव कमवू शकते.’’

-डॉ. मृणाली देशपांडे ( बी. एच. एम. एस).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : भोंदू खरात प्रकरणानंतर राज्यभर कारवाईचा धडाका; महिन्यात 15 भोंदू बाबांवर गुन्हे दाखल, नाव-गावासह 'अंनिस'ने यादीच केली जाहीर

IPL 2026 : स्टार खेळाडूंसोबत शेवटचा'सेल्फी'! १४ वर्षीय अभव, २० वर्षीय क्रिकेटपटूचा जागीच मृत्यू; DC vs RCB सामन्यानंतर भयानक घडलं

ओबेन इलेक्ट्रिककडून Rs. 99,999 रूपये या सुरुवातीच्या किमतीत Rorr EVO सुपर बाइक लाँच; दमदार फीचर्स पाहा

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील खुपिरे येथील सुरभी लॉजवर पोलिसांचा छापा

MLC Election: झीशान सिद्दीकींच्या उमेदवारीमुळे वाद पेटला; एक बडा नेता शिवसेनेकडे वळला? तर दुसरा दुखावला, राष्ट्रवादीत बंडाची चाहूल!

SCROLL FOR NEXT