pailwan rahul aware 
पुणे

'सकाळ' इम्पॅक्ट : पैलवान राहुल आवारेनं अवैध धंदा करणाऱ्यांना दाखवला वर्दीचा खाक्या

निलेश बोरुडे

किरकटवाडी: राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कुस्तीचा आखाडा गाजवणारे पैलवान राहुल आवारे यांनी पुणे ग्रामीण पोलीस दलात पोलीस उपाधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत खडकवासला येथील ताडी विक्रेत्यावर कारवाई केल्यानंतर त्यापाठोपाठ खानापूर येथे एका हॉटेलवर छापा टाकून देशी-विदेशी अवैध मद्द्यसाठा जप्त केला आहे. हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याबात 'सकाळ'च्या माध्यमातून पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते.जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी तात्काळ अवैध धंद्यांवर कारवाई केली जाईल असे 'सकाळ'शी बोलताना सांगितले होते. अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षकांनी उपाधीक्षक पै.राहुल आवारे यांच्यावर सोपवली आहे. त्यानुसार आवारे यांनी हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई सुरू केली आहे.

खडकवासला येथे धरणाच्या मागच्या बाजूला जंगलात ताडी गुत्त्यावर कारवाई करत दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व बशेर मानतेश भंडारी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर काल दिनांक 15 मार्च रोजी रात्री 10 च्या सुमारास खानापूर येथील एका चायनीजच्या टपरीवर राहुल आवारे यांच्या पथकाने छापा टाकला. सदर कारवाईत देशी-विदेशी मद्याचा सुमारे तेरा हजार रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला व साईनाथ शिवाजी राठोड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी पोलीस उपाधीक्षक पै राहुल आवारे यांच्यासह हवेली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम, पोलीस उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते, खानापूरचे पोलीस पाटील गणेश सपकाळ व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक शेलार यांचा दावा ठरला खोटा
हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्याशी काही दिवसांपूर्वी संपर्क साधला असता हवेली पोलीस ठाण्याची हद्द अत्यंत छोटी आहे, येथे अवैध धंदे सुरू नाहीत असा अजब दावा त्यांनी केला होता. पोलीस उपाधीक्षक पै राहुल आवारे यांनी हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांवर केलेल्या धडक कारवाईमुळे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांचा दावा मात्र खोटा ठरला आहे.

दोघांवर कारवाई,इतरांचे काय?
पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघांवर कारवाई करण्यात आली मात्र इतर अवैध व्यावसायिकांवर कारवाई कधी होणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.सिंहगड परिसरात अनेक हॉटेल व्यावसायिक अवैध मद्यविक्री करत आहेत. तसेच गावठी दारुचे गुत्तेही अनेक ठिकाणी सुरू आहेत, त्या सर्वांवर कारवाई व्हावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

"पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार संपूर्ण पुणे ग्रामीण कार्यक्षेत्रातील अवैध धंद्यांवर धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी कारवाई करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे यापुढेही अवैध धंद्यांवर अशाचप्रकारे कारवाई करण्यात येणार आहे." 
पैलवान राहुल आवारे, पोलीस उपाधीक्षक, पुणे ग्रामीण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT