wrestling on occasion of Sri Kalbhairavanath Yatra Shivraj Rakshe and Kanchan Sanand became the silver mace bearers Sakal
पुणे

Pune : श्री काळभैरवनाथ यात्रेनिमित्त भव्य कुस्ती आखाडा; पै.शिवराज राक्षे व कांचन सानंद ठरले चांदीच्या गदेचे मानकरी

ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ उत्सव हा हनुमान जयंतीच्या दिवशी साजरा केला जातो. यात्रे निमित्त समस्त बालेवाडी ग्रामस्थ व धर्मवीर आखाडा

शीतल बर्गे

बालेवाडी : येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ उत्सव हा हनुमान जयंतीच्या दिवशी साजरा केला जातो. यात्रे निमित्त समस्त बालेवाडी ग्रामस्थ व धर्मवीर आखाडा यांच्याकडून खास कुस्ती शौकिनांसाठी निकाली कुस्त्यांच्याजंगी आखाड्याचे नियोजन (ता. ३० एप्रिल) रोजी सायंकाळी बालेवाडी येथील दसरा चौकातील संजय फार्म येथे करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्रातील अनेक नामवंत मल्लांनी येथे आपली उपस्थिती लावली. यामध्ये बहुतेक कुस्त्या या चुरशीच्या झाल्या. विजय पैलवानांना बालेवाडी ग्रामस्थांकडून एक हजार रुपयांपासून पाच लाखांपर्यंत रोख रक्कम ,त्याचबरोबर चांदीच्या गदा बक्षीस रूपात देण्यात आल्या.

बालेवाडी येथे श्री काळभैरवनाथ उत्सवा निमित्त भव्य अशा कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शिवराज राक्षे (डबल महाराष्ट्र केसरी ) विरुद्ध मिलाद सोरमी (इरान )यांची कुस्ती ही चुरशीची ठरली .या कुस्ती शिवराज राक्षे हे विजयी झाले.

यांना स्व. पै .मगन बालवडकर यांच्या स्मरणार्थ माजी नगरसेवक अमोल बालवडकर आणि सनी बालवडकर यांच्याकडून चांदीची गदा व पाच लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले .तर महिलांच्या कुस्ती मध्ये कांचन सानप विरुद्ध सुकन्या मिठारे कुस्ती झाली या कुस्ती मध्ये कांचन सानप यांनी विजय मिळवत मानाची चांदीची गदा व ५० हजार रुपये बक्षीस पटकावले .हे बक्षीस वैशाली बालवडकर यांच्याकडून त्यांना देण्यात आले .

या ठिकाणी महाराष्ट्रातून अनेक नामांकित मल्लांनी कुस्तीसाठी हजेरी लावली. यावेळी या कुस्त्यांचे पंच म्हणून रोहित आमले ( आंतरराष्ट्रीय पंच), विक्रम पवळे ,तुषार गोळे, निलेश मारणे यांनी विशेष कामगिरी केली .तर निवेदन हे पै. बाबाजी लिमन यांनी केले .

या ठिकाणी महिलांच्या २० तर पुरुष गटामध्ये ७० अशा चुरशीच्या लहान मोठ्या कुस्त्या पार पडल्या .या कुस्ती आखाड्या साठी राहुल बालवडकर यांचे विशेष सहकार्य लाभले. त्याचबरोबर नियोजनामध्ये संजय बालवडकर ( गोसेवक), दत्तात्रय बालवडकर (उपाध्यक्ष राष्ट्रीय तालीम संघ), लहू बालवडकर , संग्राम बालवडकर,जालिंदर बालवडकर, गणेश बालवडकर व समस्त बालेवाडी गावठाण यांचे विशेष सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT